मुंबईत महाराष्ट्रातील पत्रकारांची बैठक संपन्न ,पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी ,पत्रकारांना टोल मुक्त करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या

0
97

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा तसेच संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा .मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : संतोष शिंदे : पत्रकार आपला जीव धोक्यात घालून आणि आपल्या कुटुंबाचा विचार न करता जनतेसमोर सत्यता आणण्यासाठी कायम धडपडत असतो.तर शासनाच्या विविध कामांचा लेखाजोगा सर्वसामान्यांपर्यंत निर्भिड पने मांडत असतो.यात त्या पत्रकाराचा काहीही स्वार्थ हेतू नसतो तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार सर्वच पत्रकारांना  सरसकट पने पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात आणि पत्रकारांना सरसकट टोल माफी करण्यात धाडस दाखवत नाही त्यामुळे तमाम पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला जात असून बऱ्याचशा पत्रकारांना गुंडांकडून धमक्या दिल्या जातात तर काही पत्रकारांना जीव सुद्धा गमवावा लागला अजून किती पत्रकारांना जीव गमवावा लागेल मग हे शासन जागे होऊन पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणार का ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय बोर्डे आणि  महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारत पवार यांनी महाराष्ट्र शासनास केला असून याकामी शासनास वेळीच जागे करून पत्रकारांना सरसकट टोल माफी करण्यात यावी ,पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी या आणि अन्य शासकीय सवलती पत्रकारांना मिळून देण्या साठी पत्रकार असोसिएशन मार्फत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती संजय बोर्डे यांनी यावेळी सांगितले.

रविवार दिनांक-०५/०३/२०२३रोजी चैत्यभूमी दादर ,मुंबई या ठिकाणी ठीक सकाळी ११.०० वाजता पत्रकार संरक्षण कायदा कडक अंमलबजावणी व्हावी या करिता, सर्वच पत्रकारांना सरसकट टोल माफी करण्यात यावी यासाठी पत्रकार संजय बोर्डे यांच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांच्या, मेहनतीने महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना त्यांनी वरील ठिकाणी एकत्रित आणूनी संघटना स्थापन केली आहे. या माध्यमातून पत्रकार चर्चा करून पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण, वाईट प्रसंगी मदत, पत्रकारच्य होणाऱ्या हत्या आणि हल्ले, धमक्या, खोट्या केसेस मध्ये अडकविने पत्रकारांची बदनामी करणे. अशा बऱ्याच विषयांवर चर्चा झालेली आहे. जो पत्रकार सामान्य जनतेपर्यंत होणाया अत्याचार, भ्रष्ट कारभार, समाज जागृतीचे काम करतो. त्या पत्रकाराला कोणत्याही सोयी सुविधा न देता वंचित ठेवणे. ह्या विषयांवर चर्चा होऊन त्या संदर्भात पत्रकारांना ज्या यथा योग्य सुविधेसह संरक्षण देने व शक्य तेवढ्या सुविधा मिळणे बाबत सरकार दरबारी निवेदना मार्फत मागणी करणे. तसेच पत्रकारांना विमा संरक्षण देणेबाबत आणि लागू करणे बाबत पाठपुरावा करणे, पत्रकारांना शासनातील कोट्यामधून सदनिका मिळणे बाबत हक्क मिळवून देणे याविषयी चर्चा करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वंदन करुन पत्रकार संघटना बांधणी मजबूत करणे. प्रस्ताव पास करण्यात आला १) प्रत्येक कारवाई कागदोपत्री करणे.
२) पत्रकार संघटना कायदेशीर सल्लागार नेमणे ३) प्रत्येक पुढील नियोजनाच्या गोष्टीसाठी
त्या त्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना कागदोपत्री पत्रकार करणे४) वार्षिक वर्गणी गोळा करणे
५) एखाद्या पत्रकारावर संकट आले तर संघटनेच्या माध्यमातून मदत करणे ६)संरक्षण विमा योजने बाबत निर्णय घेणे,७) येणाऱ्या दिवसांत पत्रकार संघटनेसाठी काही महत्वाच्या मिटिंग साठी एखादे ऑफिस ८)असणे ,महत्वाचे आहे. त्यासाठी सरकार दरबारी
मागणी करून मिळवणे.
आज आपली संघटना महाराष्ट्र दर्जावर उपलब्ध असल्या कारणाने कधी महाराष्ट्राच्या कानाकोपयात जलद पोहचण्यासाठी एखादी चार चाकी गाडी असने महत्वाचे आहे त्या मार्फत जलदपणे आपण महत्त्वाच्च कामानिमित्त त्या ठिकाणी पोहचू शकलो यासाठी गरज आहे. या बैठकीस पत्रकार लीलाधर पाटकर ,मधुकर गवई, सतीश बेदरे ,सुभाष बर्वे ,मयूर निकाळे, गणेश काप ,सुरेश शेट्टी ,अतुल जाधव,
जनार्दन येडगे ऋषिकेश बोर्डे प्रशांत गोडाने भास्कर पैठणकर गौतम कोरडे भास्कर खरात, संजय मुख्यदल, संतोष शिंदे, राजू दोंदे, संदिप गरकळ,रुपेश कांबळे,शिवाजी राऊत, अमोल रत्नपारखे, सुनिल मोटे ,प्रवक्ते विक्रम खरे, मेहूल पवार, दिपक आढाव, महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक भारत पवार,ओझर टाऊनशिप नाशिक, सादिम शेख यांच्यासह महाराष्ट्रातून तमाम पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here