….. अन्यथा कांद्याचा वांधा आपल्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही : कुबेर जाधव
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तरी इच्छुक असणाऱ्यांनीच संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१. देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : राज्यात २,३८ लाख मागच्या वर्षी उन्हाळ्यात उन्हाळ कांद्याची नाफेड मार्फत खरदी १० महिन्यांपूर्वी केलेली होती,तो कांदा कधीच संपला हे शेतकऱ्यांना लक्षात यायला वेळच लागला नाही परंतु सद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले की नाही हा प्रश्नच असून अजुनही लाल कांद्याची नाफेड मार्फत खरेदी सुरू झाली नाही, सद्ध्या कांद्याच्या भावात उतरती कळा लागली असून कांदा भावा बद्द्ल सरकार फक्त वल्गना करत असते मात्र अंमलबजावणीसाठी वेळ काढून पणा काढत असते त्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणता की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे जरी खरे असले तरी कांद्यास प्रत्यक्ष कमी भाव कधी देणार ? हे मात्र गुलदस्त्यात ठेवले नुसते वल्गना करून शेतकऱ्यांना वेठीस धरणे हे योग्य आहे काय ? असा सवाल महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना केला असून तात्काळ हमी भावाने मोठ्या प्रमाणात प्रत्येक बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरू करण्यात यावी तसेच मुख्यमंत्री साहेब यांनी अभ्यास करून , माहिती घेऊन कांद्याची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा सभागृहात सादर करावी अशीही मागणी जाधव यांनी केली असून अन्यथा कांद्याचा वांदा आपल्या अंगलट आल्या शिवाय राहणार नाही,,असेही कुबेर जाधव यांनी ठणकावून सांगितले.
