पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्री चोंडी( नाशिक) येथे येणार : अधक्ष राष्ट्रीय सल्लागार समिती रघुनाथ कुवर

0
114

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे संपर्क करा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : ३१ मे २०२३ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त धनगर सोशल ऑर्गनायझेशन पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमा प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निमंत्रित करण्यात येत असून लवकरच दिल्ली येथे पंतप्रधान मोदीजी यांना आमंत्रित करण्यासाठी महाराष्ट्रातून शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष रघुनाथजी कुवर साहेब यांनी कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ह्या वेब चॅनलशी बोलतांना दिली.

वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन ( WDSO) आयोजित ऑनलाइन मीटिंग नुकतीच घेण्यात आली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच गावा गावातून समाज बांधव मोठ्या संख्येने चोंडी या गावी ३१ मे २०२३ या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी लवकरच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून वाफगाव ( खेड) येथून दि. २४/५/२०२३ रोजी रथ यात्रेचा शुभारंभ होणार. दि. ३०/५/०२३ रोजी रथयात्रा चोंडी गावी पोहचणार ज्यांना जसे जमेल तसे रथयात्रे मध्ये तन,मन, धनाने आपले योगदान द्यावे असे आवाहन जगातील तमाम जनतेला करण्यात आले आहे.

ऑनलाइन आयोजित संपन्न झालेल्या मीटिंगमध्ये बबनराव आटोळे संस्थापक अध्यक्ष, बारामती, अशोक पातोंड, अकोला, शिवाजी गावडे बुवा ,मुंबई, भाग्यवंत नाईकवडी,अकलूज ,व्यंकटेश चामनर,आंबेजोगाई, सखाराम खोत,पोपटराव पवार,इंदापूर,खंडूतात्या तांबडे,अजय गाडवे ,संभाजी साबळे,पुणे, पवन पोटे नागपूर, कांदळकर साहेब पुणे, रंजनाताई कोळेकर सांगली, जयश्रीताई टकले पुणे, कैलास गायकर ,दादा जाधव नाशिक, निंबा जाधव संपर्कप्रमुख महाराष्ट्र, पिंटू मुसळे ,संतोष बोरकर, शंकर रुपनवर जेजुरी ,दीपक कातुरे, पुरंदर शांताराम, भादेकर साहेब नाशिक, रामदास मोरगळ पुणे , लोंढे साहेब, सुनील खामगळ, अहमदनगर ,धनंजय माने श्रीरामपूर, सचिन धायगुडे पालघर ,शाहीर खरात यांचे चिरंजीव श्रीगोंदा ,विश्वास सर बुलढाणा, डॉक्टर विष्णू माहुरे चंद्रपूर ,अधिक पिंगळे सांगली, प्रतीक उरकुडे झरी जामणी, सोनू भिसे कर्जत, बाळासाहेब भुसारी नेवासा ,रणधीरा हाके लातूर, वैभव शिंदे पुणे ,विलास पाचपोळ जळगाव आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here