वऱ्हाणे येथे चालली सरपंच पदाची दादागिरी आता लक्ष घालतील का प्रशासकीय अधिकारी ! सरपंच आणि ग्रामसेवक यांचेवर गुन्हा दाखल करा अन्यथा आमरण उपोषण छेडणार : राजेंद्र पाटील राऊत
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्ती साठी इच्छुकांनी संपर्क करावा.तसेच आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा. संपर्क मो.9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वऱ्हाने ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ खूपच रंगला असून गेल्या दोन वर्षांपासून हा गोंधळ मिटता मिटत नसल्याचे चित्र असून उलट त्या गोंधळात अधिक भर पडत असलयाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते आहे.अलीकडेच गोंधळात भर म्हणजे ग्रामसेविका सुवर्णा साळुंखे ह्या मुख्यालयी राहत नसताना सुद्धा वऱ्हाणे गावचे सरपंच सौ.अनिता भरत पवार,जवाहरलाल पवार यांच्या संगनमताने बनावट व खोटे कागदपत्र बनवून मुख्यालयी राहत असलयाचा देखावा साळुंखे यांनी शासन दरबारी सादर करून दरमहा शासनाचे हजारो रुपये घरभाडे भत्ता घेऊन शासनाची आतापर्यंतची लाखो रुपयांची फसवणूक वरील तिघांनी केला असल्याचा आरोप पत्रकार राजेंद्र राऊत पाटील यांनी केला असून त्यांचेवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांनी अप्पर जिल्हाधिकारी ,मालेगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात राऊत यांनी म्हटले आहे की सदरचा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने वरील तिघांकडून शासकीय रक्कम वसूल करण्यात येऊन तिघांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सरपंच सौ.अनिता पवार यांच्या कार्यकाळात झालेल्या सगळ्या गैरव्यवहाराची तात्काळ कसून चौकशी करण्यात यावी व त्यांना पद मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली असून अन्यथा मी २० मार्च २०२३ पासून मालेगाव पंचायत समिती समोर आमरण उपोषण छेडणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे राजेंद्र राऊत पाटील यांनी दिली आहे.निवेदनाच्या प्रती अप्पर जिल्हाधिकारी, मालेगाव,प्रांत अधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांना दिल्याचेही राऊत यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.