दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न , कष्टविना फळ ना मिळते तुज कळते परी ना वळते : राजेंद्र पाटील

0
153

भारत पवार : मुख्य संपादक : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुकांनी संपर्क करावा तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो. 9158417131 
कष्टविना फळ ना मिळते तुज कळते परी ना वळते! कुठलीही गोष्ट ही सहज मिळत नाही ! राजेंद्र पाटील निकम
वैजापूर : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सुनील खंडागळे _ 

वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथील न्यू हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पाडला, या कार्यक्रमासाठी चिकटगाव शालेय समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र पाटील निकम हे होते तसेच शालेय समितीचे सदस्य देविदास निकम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्थान भूषविले तर व्यासपीठावर चिकटगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच उत्तमराव निकम, ग्रामपंचायतचे माजी सरपंच आर के पाटील शालेय समितीचे सदस्य दुर्गादास भगत, संतोष जाधव ,किरण गायके, गणेश सूर्यवंशी, सतीश निकम, महेश निकम, बाबासाहेब बिडवे, बाबासाहेब निकम, जगदीश निकम, पद्माकर निकम, गणेश निकम, बापू निकम, नवनाथ निकम बी व्ही आर कम्प्युटर चे संचालक भगवान जाधव, ओम पिनाकेश्वर कम्प्युटरचे संचालक कुहिले सर, अनिल निकम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी के जाधव ,एम के निकम, बबनराव निकम, किरण कुंदे, दादासाहेब निकम ,अशोक भोरे, सुधीर सोनवणे ,संजय मगर हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील निकम व प्रमुख पाहुणे देविदास निकम व व्यासपीठावरील अतिथी यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक माजी सहकार मंत्री कै विनायकरावजी पाटील अण्णा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एसपी आहेर यांनी मांडले यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा या स्पर्धेमध्ये आलेले प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थी यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, ओम पिनाकेश्वर कम्प्युटर तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यानंतर प्रशालेतील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले प्रशालेचा माजी विद्यार्थी बाबासाहेब निकम यांनी शाळेबद्दल ऋण व्यक्त केले व नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व संचालक मंडळ व प्रमुख पाहुणे शिक्षण प्रेमी नागरिक यांचा सत्कार करण्यात आला या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता दहावीची विद्यार्थिनी साक्षी संजय राऊत हिने प्रशालेस शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली सूत्रसंचालन सहशिक्षक श्री किरण कुंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक सुधीर सोनवणे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षण प्रेमी नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व शिक्षक वृंदांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here