देवळा : शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटणार : शिवाजी महाराजांना केदा आहेर यांच्या हस्ते आज हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार …!
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : भारत पवार : शिवजयंतीचे औचित्य साधून देवळा शहरातील भव्यदिव्य शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष पंकज आहेर यांनी दिली.
तालुक्याच्या इतिहासात प्रथमच हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार असून शहर व तालुका शिवप्रेमीं मध्ये मोठा आनंद पसरला आहे. शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा उत्साह पार पाडण्यासाठी पंचक्रोशीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे सांगण्यात आली.
भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते आज दुपारी ४ वाजता हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असून पंचक्रोशीतील शिवप्रेमी मध्ये उत्साह दाटला आहे.केदा आहेर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाची सजावट अनेकांचे लक्ष वेधून घेत असून देवळा शहरातील इमारती,चौक,गाड्या,रस्ते भगव्या झेंड्यांनी सजले असून शहरास वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे रात्री विद्युत रोषणाई, झेंडे यांच्या मुळे ग्रामस्थांचे लक्ष अधिक वेधले जात आहे.यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही आयोजकांनी सांगितले.