ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला हल्लाबोल : निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींचा गुलाम , सर्वोच्च न्यायालयात जाणार

0
62

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा . 9158417131

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याने उद्धव ठाकरे यांना आयोगाने डीवचल्याचे ठाकरे प्रेमी कार्यकर्त्यात जोरदार चर्चा होते आहे.त्यामुळे कार्यकर्त्यात संताप व्यक्त केला जात असलयाने उद्धव ठाकरे आता खरे मैदानात उतरले आहेत त्यांनी शनिवारी पक्षाचे आमदार, खासदार,पदाधिकारी, कार्यकर्ते यांची तातडीची बैठक घेतली चर्चा करून मातोश्री बाहेर जमलेल्या जनसमुदायाला आवाहन करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचा जोरदार समाचार घेत हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुलाम आहे.त्यांनी असे काही केले आहे जे यापूर्वी कधीही झाले नव्हते.त्यांनी आपल्या समर्थकांना धीर देत पुढील निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन केले.मुंबईतील महापालिका नगराध्यक्षांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्यास सांगितले तर पक्षाचे निवडणूक चिन्ह चोरी झाले असून चोराला धडा शिकवण्याची खरी गरज आहे.असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा समाचार घेतला.शिवसैनिक सोबत असताना आपल्यावर चालून आलेल्या मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास ठाकरे यांनी जमलेल्या जनसमुदायाला दिला.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सर्वोच्च न्यायालय आपणास नक्कीच न्याय देणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here