शिवजयंती घराघरात दिवे लावून साजरी झाली पाहिजे

0
111

भारत पवार  : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. मो. 9158417131

पुणे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क    शिवछत्रपती यांची सार्वजनिक साजरी होणारी शिवजयंती ही तितक्याच उत्साहात, आता प्रत्येकाच्या घरोघरी साजरी झाली पाहीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, पराक्रम, बुद्धीचातुर्य, रयतविषयक धोरणे आणि शिवविचार ही सर्वांपर्यंत पोहचले पाहिजेत.. उभ्या आयुष्यात कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यनारायण ची पूजा घातली नाही. गडावर कधी कुठलेही कर्मकांड केले नाही,अंधश्रध्दा पाळली नाही. कुठल्या ही मोहीम वर लढाईवर जाताना पंचांग मुहूर्त पाहिला नाही… त्यासाठी आता शिवजयंती निमित्त अशिक्षित अज्ञान वर्गाला. छत्रपती शिवाजी महाराजाचा खरा इतिहास जागो जागी कार्यक्रम लावून सांगितला गेला पाहिजे. उभ्या जगाला आणि घरोघरी छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास माहित झाला पाहिजे. शिवजयंतीला आपण आपल्या घरी दिवे लावावे. व घरावर भगवा झेंडा लावावा. घराबाहेर रांगोळी काढावी, जेणेकरुन शिवजयंतीचे महत्व आपणास व भावी पिढीस कळेल. तसेच १९ फेब्रुवारी फक्त जयंती न राहता..एक सण व्हावा. आठरा पगड जाती अन् बारा बलुतेदारांचा सण म्हणजे शिवजयंती…

सनातनी विचारांचे लोक एका लोककल्याणकारी राजाला देव बनवत आहेत. महाआरती करून दैवतीकरण करत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दडवण्यासाठी केविलवाना प्रयत्न समाजात चालू आहे..

पुन्हा पुन्हा तेच. छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवतीकरण.. शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून जयंती साजरी करणे म्हणजे हा सनातनी कट आहे.. अजून ही छत्रपती शिवाजी महाराजांची सनातनी, ब्राह्मणी विळख्यातून सुटका झालेली नाही. महाआरती नको. छत्रपती शिवरायांच्या वरती भाषणे झाली पाहिजेत. त्यांचे पोवाडे गायले गेले पाहिजेत.. शिवछत्रपती यांचा इतिहास सांगितला गेला पाहिजे.. छत्रपती शिवाजी राजांची आरती करणे म्हणजे शिवछत्रपती राजांचे दैवतीकरण करणे आहे.. हे एक षडयंत्र आहे.. छत्रपती शिवाजी राजे हे प्रकट होऊन, किंवा यज्ञ, होम हवन मधून जन्मले नाहीत.. महाआरती करणारे ब्राह्मणच.आणी बामणांची दलाली करणारे आमच्यातील दलाल आहेत जे महाआरती करण्याचे नियोजन करतात हा सांस्कृतिक दहशतवाद बंद करा.. भोंदू भक्तांपासून छत्रपती शिवरायांना धोका आहे.. अनेक महापुरुषांच्या बाबतीत अपमान पुन्हा पुन्हा घडवला जातोय. त्या महापुरुषाला त्याच्या हयातीत त्या काळातले प्रस्थापित सनातनी लोकांनी विरोध केला. त्याच्या तत्वाला विचारांला व कार्याला विरोध केला. त्यांची बदमानी केली. पण दलालांनो एवढेही करून शिवछत्रपती यांचे थोरपण नाहीसं होत नसतंय. सामान्य लोक त्याना व त्याच्या मागे त्याच्या विचारांना मानतात. तसे वागायचा प्रयत्न पण करतात…पण सनातनी लोक शिवछत्रपती यांची शिकवण आणि विचार लोकांपर्यंत पोहोचणार नाही यांची काळजी घेतात. लोकांना फसवतात.. खोटा इतिहास लिहितात. खोटा इतिहास शिकवतात. खरं आणि खोटं यांची बेमालूम भेसळ करून विकतात. शिवछत्रपती यांची प्रतिमा आणि प्रतीके विचार सामान्यजनांना आदराच्या, श्रद्धेच्या आणि निष्ठेच्या वाटतात..आणि इथं प्रस्थापित मंडळी मोठी हुशार असतात. कुणी सत्तेमुळे प्रस्थापित असतात, कुणी संपत्तीने प्रस्थापित असतात. कुणी प्रतिष्ठेने प्रस्थापित असतात. खरं म्हणजे हे सर्व एकच असतात.. असे अनेक महापुरुषांच्या बाबतीत घडत आले आहे आणि आजही घडतंय समाजात..

महाआरती नको!छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि व्याख्यान ठेवा. ब्राह्मणी सनातनी कावा उधळून लावा.संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा, मराठा युवा संघटना, मराठा क्रांती मोर्चासह सर्व संघटनांनी छत्रपती शिवरायांच्या आरती विरोधात ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. तेतीस कोटी देवांच्या कर्तुत्वालाही मागे टाकणारे कर्तुत्व माझ्या छत्रपती शिवरायांचे आहे.. शिवाजी महाराजांचे दैवतीकरण करणे म्हणजे शिवाजी महाराज यांना छोटे करणे , देव करणे, त्यांची पूजा करणे.. भविष्यात मुर्ती समोर नारळ फोडुन नवसं बोलणारी पिढी निर्माण होऊ शकते.. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती गाऊन जयंती साजरी करणे अत्यंत चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरत्व आणि विरत्व आणि शौर्य कथा सांगा. पुनः महाआरती पुनः ब्राह्मण पुन्हा दैवतीकरण नको..छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष आहेत. एकदा का त्यांना दैवत्व दिलं की, मग त्यांचं कार्य व पराक्रम हा त्या देवशक्ती पणाखाली झाकोळून जाईल. देव काहीही करू शकतात या सदरात. ‘स्वराज्य’ मोजले जाईल. छत्रपती महाराजांविषयी बोलताना प्रत्येकानी शिवराय आणि स्वराज्य हे असच अधिक नेमकेपणाने सर्वांपुढे मांडलं पाहिजे…

समाजातील काही महाभाग लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांना शंकराचा अवतार म्हणून समाजात टाळ्या मिळवतात, मात्र यांचे काय संदर्भ कशावरून शिवछत्रपती शंकराचा अवतारी देव संदर्भ नाही.. देव आमच्या अस्मितेची सर्वोच्च अध्यात्मिक श्रध्दा आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना देव करून करून कुठला कावा साधला जातोय यावर देखील मंथन चिंतन व्हायला हवे..छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सारखे हाडा मासाचे व्यक्ती होते, म्हणूनच ते आज देखील आमची प्रेरणा आणि पिढ्यांचे प्रेरक आहेत,मात्र त्यांना देव करून आणि त्यांच्यावरती आरत्या लिहून त्यांना मंदिरबंद करण्याचे षडयंत्र तडीस जाताना दिसत आहे. देव दर्शनपात्र असतो मात्र प्रेरक नाही..शिवबाराजे मात्र आम्हांला प्रेरणा देतात..छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनगटात बळ होते ते पंचांग मुहूर्त भविष्य पहात न्हवते आणि ते दैववादी न्हवते म्हणून त्यांची आरती नकोच.. शिवरायांचा पराक्रम, कार्यकर्तुत्व ऐकावे ते पोवाड्यातूनच, भाषणातूनच! आरती करून दैवीकीकरण करण्याचा घाट घातला जात आहे तो हाणून पाडला पाहिजे.जो समाज सत्य स्वीकारत नाही, तो समाज कधीही प्रगतशील होत नाही, असत्य समाज हा व्यवस्थेचा गुलाम असतो…छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीला पर्याय जिजाऊ वंदना आहे. यूट्यूबवर सर्वत्र जिजाऊ वंदना उपलब्ध आहे. भलेही आम्ही स्वत:चं अस्तित्व पणाला लाऊ, पण समाजाला छत्रपती शिवरायांची खरी ओळखच देऊ..। विश्वव्यापक शिवजयंती उत्सव सोहळा.. *शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात..*
लेखक – 
*✍️संतोष शकूंतला आत्माराम*
बादाडे पाटील ,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here