ठाकरे गटाची गंभीर अवस्था,शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यात शिंदे गटाची सरशी : डॉ.बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे देश चालतो – मुख्यमंत्री
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क .मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत असून ठाकरे गटात गंभीर अवस्था प्राप्त झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते शिंदे गटाने महाराष्ट्राचे वातावरण तापवले होते.त्यामुळे राजकारणात वेगळाच गोंधळ माजला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याने शिंदे गटाची सरशी झाल्याने शिंदे गटाने आनंद व्यक्त केला आहे.मात्र ठाकरे गटात गंभीर अवस्था प्राप्त झाली आहे. शिवसैनिकांनो हार मानायची नाही लढाई जिंकायची आहे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना केले आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना ह्या नावासाठी आणि धनुष्यबाण ह्या चिन्हासाठी गेल्या अनेक महिन्यापासून या प्रकरणावर दोन्ही गटाकडून युक्तिवाद झडत होता. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर करून शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव बहाल केल्याने शिंदे गटाची सरशी केली.या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने प्रमाणे देशात कारभार चालतो,हा घटनेचा विजय आहे.लोकशाहीचा हा विजय आहे.आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे.त्यांचा संकल्प आणि विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं.मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो.बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे.बाळासाहेबांच्या विचारांशी आणि घेतलेल्या निर्णयाशी एकरूप झालेल्या आमदार,खासदार, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिक यांचा हा विजय आहे. या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो.आपल सरकार नियम आणि कायद्याने स्थापन झालं.त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मेरिट वर आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच प्रतिक्रिया देताना सांगितले.
खा.संजय राऊत यांची प्रतिक्रिया
ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खा.संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रया व्यक्त करतांना सांगितले की हे अपेक्षित होते ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाप झाला.हा वापर कुठपर्यंत झाला हे स्पष्ट होते. हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही.श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला तर सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असे केले पाहिजे.जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखो शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजार बुणगे विकत घेतात त्यामुळे निवडणूक आयोगा वरचा विश्वास जनतेने गमावला आहे.अशी प्रतिक्रया खा.संजय राऊत यांनी दिली.न्यायालयाचा निर्णय बाकी असताना निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र वरती अन्याय आहे.शिवाय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ताब्यात घेण्यासाठी हा फास आहे.माझा निवडणूक आयोगावर विश्वास नाही असेही राऊत यांनी संगितले.