ब्राम्हणगाव येथे फेवरब्लॉक कामाचे भूमिपूजन संपन्न
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो. ९१५८४१७१३१ मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत फेवरब्लॉक कामाचे भूमिपूजन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत ब्राह्मणगाव ग्रामपालिकेच्या वतीने फेवरब्लॉक कामाचा शुभारंभ गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते पार पडला .
यावेळी सरपंच श्री.किरण अहिरे, उपसरपंच श्री.बापुराज खरे,जेष्ठ नेते श्री.यशवंत बापू अहिरे जेष्ठ ग्रामपालिका सदस्य श्री.विनोदबापू अहिरे,श्री.रत्नाकर अहिरे,सौ.ज्योती खरे,श्री.केदाभाऊ ढेपले, सामाजिक कार्यकर्ते अशोकबाबा अहिरे, श्री.विश्वास खरे ,श्री. बाळासाहेब अहिरे,ग्रामविकास अधिकारी श्री.संजय पवार सामाजिक कार्यकर्ते,श्री.संतोष गायकवाड, श्री.अशोकबाबा खरे,दत्तात्रेय खरे,श्री.अनिल खरे संजय खरे,प्रदीप सोनवणे,श्री.राजूमेजर परदेशी,श्री.कैलास मालपाणी, श्री.काळू अहिरे,कैलास पानपाटिल, श्री.निंबा पानपाटील श्री.नानभाऊ अहिरे,श्री.विनायक खरे,श्री.श्रीराम साळुंखे,श्री.राकेश खरे,श्री.लक्ष्मीनारायण मालपाणी,श्री.मांगा पाव्हने,श्री.पोपट पानपाटील, या सर्व मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन निमित्त पूजा करून श्रीफळ वाढवण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शेवटी सरपंच श्री .किरण अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले,तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे उपसरपंच श्री .बापुराज खरे यांनी आभार मानले.
