वादग्रस्त राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर तर रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. मो.९१५८४१७१३१

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अँड न्यूज पेपर नेटवर्क : गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील वातावरण तापले होते. त्यामुळे कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या वेळी कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान केल्या मुळे कोश्यारी चांगलेच अडचणीत आले होते.विरोधकांनी राज्यपालांच्या विधानावरून भाजपाल धारेवर धरले होते.आणि राज्यपालांची राजीनाम्याची मागणी लाऊन धरली होती. कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वीच आपला राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांचे कडे दिला होता. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी तो राजीनामा स्वीकारला असून रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे.
राज्यपाल रमेश बैस यांची कारकीर्द :
रमेश बैस मूळचे छत्तीसगड येथील राजापूर येथील आहेत.त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी झाला असून ते ७५ वर्षांची आहेत.त्यांनी नगरसेवक पदापासून आपल्या राजकारणास सुरुवात केली असून सन १९९९ मध्ये दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंदिय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री ( स्वतंत्र कारभार ) होते.त्यांनी त्रिपुरा राज्याच्या राज्यपाल पदीही उत्तम पद्धतीने काम पाहिले आहे.ते भाजपचे सदस्य असून सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल पदी विराजमान झाले आहेत.