दिंडोरी : अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्ती समस्यांबाबत गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन

0
74

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा : 9158417131
दिंडोरी : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अँड न्यूज पेपर नेटवर्क  दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्त्यांच्या समस्यांबाबत दिंडोरी तालुका अनु जाती व नवबौद्ध ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने गटविकास अधिकारी विनोद मेढे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, अनु जाती व नवबौद्ध यांच्यासाठी प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकल्याण विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत ज्या वस्तीमध्ये योजना राबवयाच्या असतोत. त्या घोषित अनु जाती व नवबौद्ध वस्तीमध्ये न राबवता इतर ठिकाणी राबविल्याचे निदर्शनास आले आहे, याचा अर्थ एक तर त्या सदस्याला त्या कामापासून विश्‍वासात न घेता सदर निधी खर्च होतो किंवा ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्य त्यांच्या बहुमताच्या जोरावर इतर ठिकाणी खर्च करतात. ही कामे सदर वस्तीमध्ये राबवयाची असतात. उदा. पाण्याची टाकी रस्ते कॉक्रीटीकरण, प्लेवर ब्लॉक, सुशोभीकरण असे कामे सदर सदस्य आपल्या वस्तीच्या मागणीनुसार करीत असतो. परंतू सदर सरपंच व इतर सदस्य तो निधी त्यांच्या मर्जीनुसार खर्च करतात किंवा कामे मंजूर करतात म्हणून सदर निधींचा वापर करताना त्या गावातील अनु जाती सदस्य यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्या सही नुसारच सदर कामे मंजूर केली पाहिजे. तरी ग्रामसेवक यांना आपल्या बैठकीमध्ये सूचना द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेद्नावर रत्नाकर पगारे, सागर गायकवाड, कैलास गायकवाड, कुणाल बागुल, दिनकर भडदिवे, अंबादास गांगुर्डे, नितीन गांगुर्डे, प्रभाकर गांगुर्डे, सागर वि. गायकवाड, कविता गवारे, सुरेश बागूल, कैलास गायकवाड, संजविनी गायकवाड, अशोक दिवेकर, बानुबाई दुशिंग, प्रकाश गवारे, बाळू लोखंडे, सोनाली लोखंडे, शामराव गवारे, प्रदीप गांगुर्डे, वाल्मिक गायकवाड, पोपटराव आहेर, गोरखनाथ पगारे, डी. एन. पगारे, सुरेश ब्राम्हणे, राजेंद्र गांगुर्डे, विनायक गांगुर्डे, नितीन शार्दुल, संतोष लोखंडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here