सत्तेच्या जोरावर आणि पैशांच्या माजावर सनदी अधिकाऱ्यांची नियत फिरली शेतकऱ्यांशी गद्दारी करून शासनाची इज्जत वेशीला टांगली म्हणून प्रजासत्ताक दिनी फुलेमाळवाडी , माळवाडीच्या शेतकऱ्यांवर कुटुंबासह आमरण उपोषणाची भ्रष्ट अधिकाऱ्यांनी वेळ आणली !६०पेक्षाअधिक कुटुंब बेचिराख करणार का ? भारतराज पवार यांचा शासनास संतप्त सवाल सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

0
65

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि परिसरातील बातम्या साठी संपर्क करा.मो.९१५८४१७१३१

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात बेफिकीर अधिकाऱ्यांची लयलूट वाढत चालली असून बेफिकिरी अधिकाऱ्यांनी कायद्याचे आणि जनहिताचे  भान न ठेवता फक्त स्वतःचा स्वार्थ साधत आपली ढेरी जेवढी मोठी करता येईल तेवढी मोठी करण्या साठी सत्तेच्या जोरावर आणि पैशांच्या माजावर त्यांची नियत फिरल्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबांसह देवळा येथील जुन्या तहसील कचेरी समोर आमरण उपोषणास बसल्याने त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याने  ह्या घटनेने देवळा आणि चांदवड तालुक्यात खळबळ माजली असून भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहे. देवळा तालुक्यातील फुले माळवाडी आणि माळवाडी येथील गरीब शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनीच ह्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि त्यांच्या कपट निती विरुद्ध कुटुंबासमवेत आमरण उपोषणास बसण्याची वेळ आणल्याने ६० पेक्षा अधिक शेतकरी कुटुंब अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि कपट नीतीमुळे बेचिराख होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक ,संस्थापक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष भारतराज पवार यांनी उपोषण कर्त्यांची  प्रत्यक्ष भेट घेतली असता  शासनास काळीमा फासणारी भयंकर घटना समोर असल्याचे उपोषण कर्त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांच्या निवेदनावरून लक्षात येते.याबाबत अधिक माहिती अशी की ,तालुक्यात फुलेमाळवडी आणि माळवाडी येथील शेतकऱ्यांची जमीन गट नंबर ६६ ,क्षेत्र १७.१९ आर.भोगवटादार जमीन असून सदर शेतकऱ्यांचे आजोबा कुळ होते.सदर जमिनीत कुळाच्या वारसांनी कांदा बागायत पिकाची लागवड केलेली आहे आणि कायम करत असतात.तसेच ह्या जमिनीवर कुळ वारसांनी पक्क्या घराचे बांधकाम करून तेथेच शेतकऱ्यांचे वास्तव्य सुद्धा आहे.सदरच्या जमिनीत जमीन मालकाचा ७० ते ७५ वर्षांपासून कब्जा सुद्धा नाही.जमीन मात्र कुळ वारसांच्या ताब्यात आहे.असे असताना जमीन मालक बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत संपत्तीने धनाढ्य असणात्यांना हाताशी धरून जमीन विक्री करणार असल्याचे शेतकऱ्यांना कळताच सदर शेतकऱ्यांनी जमिनीचे कुळ व्यतिरिक्त होऊ नये याबाबत देवळा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांचे कडे तक्रार अर्ज सादर केले. त्यानुसार सदर विवादाचा निर्णय देणेकामी लोहणेर येथील मंडळ अधिकारी रामसिंग परदेशी यांची नेमणूक केली.आणि या नेमणुकीच्या संधीचे सोने करत स्वतःचे पिवळे कसे करून घेता येईल ही एक नामी संधी आहे असे समजत परदेशी यांनी पदाचा गैरवापर करत तक्रारदारांना विवादा कामी तक्रार मांडण्याची संधी न देता दिपक बच्छाव या मध्यस्थीस हाताशी धरून स्वतःचे हित साधण्याचा भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून एकतर्फी कार्यवाही केली. नोंद प्रमाणित करण्याचा आदेश केला गेला.त्यामुळे तहसीलदार सूर्यवंशी व मंडळ अधिकारी परदेशी यांनी केलेली कार्यवाही संशयास्पद आणि महसुली कायदेशीर तरतुदीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे शासनाची सुध्दा इज्जत चव्हाट्यावर आल्याने १०० पेक्षा अधिक शेतकरी कुटुंबावर घाला घातल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.वरील अधिकाऱ्यांच्या ,जमीन मालकाच्या आणि मध्यस्थ व्यक्तीने केलेला कारनामा आणि शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेत कळवून सुद्धा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघ्याचीच भूमिका घेतली असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला असून जमीन मालकाचा जमिनीत कब्जा नसतानाही मालकाने प्रशासनातील सत्तेचा मोठा मासा असलेला सनदी अधिकारी विवेक गायकवाड त्यांनी फितूर केलेले देवळा तहसीलदार , मंडळ अधिकारी लोहनेर यांना  हाताशी पकडून सत्तेच्या जोरावर आणि पैशांच्या माजावर खरेदी विक्री व्यवहार झाल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आम्हा ५० ते ६० कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने आम्ही आमरण उपोषणाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी च बसलो असल्याचे उपोषणकर्त्यांनी भारतराज पवार यांना यावेळी सांगितला.आमच्या मागण्यांप्रमाणे आम्हास जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असेही उपोषणकर्त्यांनी यावेळी ठासून सांगितले.प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी  ६० पेक्षा अधिक शेतकरी कुटुंबाचा विचार न करता त्यांना बेचिराख करून स्वतःचे हित पिवळे करून घेण्याचा कपट नीतीला प्रशासनातील वरिष्ठ महसूल आयुक्त ,जिल्हाधिकारी यांनी भीक न घालता वेळीच आमरण उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी भारतराज पवार यांनी याप्रसंगी केली असून त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की,  २६ जानेवारी १९५० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी  भारतीय संविधान म्हणजेच भारतीय राज्यघटना अमलात आणली.याच दिवशी म्हणजेच तो दिवस होता २६ जानेवारी.या दिवशी भारत देशास राज्य घटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशास प्रदान केली आणि तेव्हा पासून प्रजेचे हक्क अमलात आले. आणि याच दिवशी आमच्या शेतकरी राजांना आमरण उपोषणाला बसण्याची वेळ यावी ते असल्या भ्रष्ट आणि फितूर झालेल्या अधिकाऱ्यांमुळे आणि त्यामुळे प्रशासनात सुद्धा काळेमा लागला असून प्रशासनाची इभ्रत वेशीवर टांगली जाणे यापेक्षा शासनाचे दुर्दैव कोणते ? असा सवाल उपस्थित करून आमरण उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी  शासनातील वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना वेळीच कळवून सुद्धा दखल घेतली गेली हे शासनाचे दुर्दैव की शेतकऱ्यांचे दुर्दैव हेच काही कळेनासे झाले आहे.शेतकऱ्यांची जर सत्यता आहे तरी सुद्धा “गिरे तो भी मेरी टांग उपर”  असे म्हणून शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही .हे वाईट आहे.ह्या गंभीर बाबीची दखल भाजप शासनाने घेतली पाहिजे असे कळकळीचे आवाहन पवार यांनी केले असून असल्या अधिकाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या का जात नाही ? असाही सवाल करून  सत्तेच्या जोरावर आणि पैशांच्या माजावर ६० पेक्षा अधिक शेतकरी उघड्यावर येऊन बेचिराख राख होतील हे शासनास मान्य आहे का ? असेही पवार यांनी प्रशासनास आपल्या माध्यमातून प्रश्नांकित केले. वेळीच अशा भ्रष्ट आणि फितूर अधिकाऱ्यांच्या नांग्या वेळीच ठेचल्या तर नक्कीच प्रजेचे सुराज्य अवतरेल आणि शासनाची असलेली इज्जत चव्हाट्यावर न येता शासनाचा वरचष्मा वाढेल आणि अन्याय झालेल्यांना म्हणजे ती व्यक्ती शेतकरी असो की सर्वसामान्य असो त्यांना न्याय मिळून नक्कीच शासनाची विश्वासार्हता वाढीस लागले.असेही मुख्य संपादक तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश उपाध्यक्ष भारतराज पवार यांनी सांगितले असून आमरण उपोषण करणाऱ्यांचा अंत न पाहता त्यांची विश्वासार्हता वाढवावी व  उपोषणकर्त्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात असे पवार यांनी शेवटी म्हटले आहे. आमरण उपोषणकर्त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवळा येथील राज्य समन्वयक कुबेर जाधव , नमो फाऊंडेशनचे किशोर आहेर,प्रहार संघटनेचे कृष्णा जाधव ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष सुनील ( गोटू आबा ) आहेर, माजी जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर, प्रहारचे संजय दहिवडकर आदींनी पाठींबा देऊन उपोषण कर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

रामचंद्र धर्मा बागुल, साहेबराव बागुल,नानाजी रघुनाथ शेवाळे, दादाजी आनंदा बच्छाव ,सेवा निवृत्त शिक्षक नथू गणपत अहिरे, बुधा बच्छाव, लक्ष्मण शेवाळे ,शिवाजी शेवाळे, दयाराम बागुल ,अनिल शेवाळे ,मधुकर बच्छाव ,पुंडलिक शेवाळे, संजय अहिरे ,सुभाष बागुल ,चंद्रकांत बच्छाव ,तुषार बागुल, भागाबाई बच्छाव, सरलाबाई शेवाळे, लताबाई शेवाळे, भीमाबाई शेवाळे, उज्वला बागुल ,कुसुमबाई शेवाळे आदी शेतकरी आमरण उपोषणाास बसले असून शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान काल चांदवड चे प्रांत अधिकारी देशमुख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेण्या साठी आले असता देशमुख यांनी शेतकऱ्यांना  ठोस आश्वासन दिले नसल्यामुळे देशमुखाना  कोरडेच परतीचा रस्ता धरावा लागला असल्याचे समजते.

 

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here