महाराष्ट्रात २९ जानेवारी पासून थंडीची लाट येणार , हुडहुडी भरणार : हवामान खाते

0
56

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि परिसरातील बातम्या साठी संपर्क करा 9158417131

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क – 

महाराष्ट्र राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून येत्या काही दिवसांत पुन्हा थंडीचा गारवा जोरदार वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजा नुसार २९ जानेवारी पासून महाराष्ट्रात थंडीची लाट जोरदार येण्याची शक्यता आहे. जनतेची हुडहुडी वाढणार आहे. हि लाट २ फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका जोरदार वाढला असून जम्मू काश्मीर मध्ये बर्फाचा वर्षाव होतो आहे .महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार असून मुंबईतले किमान तापमान सरासरी पेक्षा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.३० जानेवारी पासून तापमानात घट होणार असून गुजरात मार्गे येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे ठाणे,पालघर,उत्तर मुंबई मध्ये अधिक गारवा असणार.राजस्थानातील नैऋत्य भागात च्रकी वादळासारखी स्थिती असल्याकारणाने त्याचा परिणाम भारतातील इतर राज्यांमध्ये होत आहे.हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार २७ जानेवारी नंतर काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here