२६ जानेवारी अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा का ? आणि कोणामुळे केला जातो ? कोणामुळे देश चालतो ? विज्ञान युगात आपण अज्ञानी का ? लिंक ओपन करा आणि वाचा सविस्तर ….

0
65

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती काही सेकंदात महाराष्ट्र भर प्रसिध्द करण्या साठी संपर्क करा.मो.9158417131.                                           मालेगाव : भारत पवार : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आज २६ जानेवारी म्हणजेच भारतीय  प्रजासत्ताक_दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हेच काही लोकांना माहीत नसते.आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त  आपण जाणून घेऊ की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय ? प्रजासत्ताक दिन साजरा का ?आणि कोणामुळे केला जातो ?

भारतीय संविधान निर्मितीचे मुख्य काम मसुदा समिती कडे होते.मसुदा समितीचे मुख्य अध्यक्ष होते विश्वरत्न डॉ.तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांच्या सोबतीला समितीत सहा सदस्य होते.त्या सहा सदस्यांनी वेगवेगळी कारणे सांगून भारतीय संविधान निर्मितीच्या अर्थात भारतीय राज्यघटना निर्मितीच्या कामात सहभाग घेतला नाही म्हणून घटना निर्मितीची अर्थात भारतीय संविधान निर्मितीची मुख्य जबाबदारी एकट्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर आली.म्हणून डॉ.बाबासाहेबांनी २ वर्ष  ११   महिने १८ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन भारतीय संविधान म्हणजेच भारताची राज्यघटना निर्माण केली. म्हणून भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आहेत.आणि  विश्वरत्न तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना आजच्या दिवशी २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो.

काही ठिकाणी याबाबत जनजागृती होतेय परंतु काही ठिकाणी अजूनही आपण,देशासाठी शहिद झालेल्या सैनिकांसाठी शहीद गीते ऐकतो,वाजवतो हे सर्व या दिवशी चुकीचे आहे. या दिवशी कुणीही शहीद झाले नाही किंवा कोणते युद्ध या आपण जिंकलो नाही. या दिवशी आपण संविधानाविषयी जाणून घ्यावे,संविधानाचे महत्व इतरांना पटवून द्यावे.आणि हे सत्य नाकारून चालणार नाही कारण सत्य आहे आणि इतिहास पुरावा आहेच मग का डॉ.बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाचे महत्त्व आज सर्वत्र पटविले जात नाही ? उच्चशिक्षित ,सुशिक्षित लोकांनी  का हा बालिश पणा करावा  ? की अडाणी ,निरक्षर पणाने वागतात ? विज्ञान युगात अज्ञानी का ? या दिवशी आनंदाने डॉ.बाबासाहेबांचे विचार , त्यांचे गुण ,त्यांचे गाणे का लावले जात नाही ? शाळेतील विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व का सांगितले जात नाही ? हे सांगणे गरजेचे आहे आणि सांगितले पाहिजे. काही ठिकाणी जनजागृती होतेय परंतु काही ठिकाणी या दिवशी अनेक शाळा , कॉलेजात,ग्रामपंचायतीत सुद्धा देशासाठी बलिदान देणाऱ्यांचे गाणे वाजविले जातात हे वाईट आहे.कारण २६ जानेवारी या दिवशी कोणी मेले आहे का ? तर कोणीच नाही .मग अशी दुःख पूर्ण गाणे २६ जानेवारी या दिवशी  का लावली जातात ,? लाज वाटली पाहिजे लाज. आनंदाचा दिवस आणि गाणे कोणती वाजवतात …..? वाईट आहे .अहो भारताला स्वातंत्र्य मिळविण्या साठी म्हणजेच  देशा साठी जे खरोखर शहीद झाले त्यांची गाणी १५ ऑगस्ट या दिवशी लावणे गरजेचे आहे. १५ ऑगस्ट रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस आपण साजरा करतो.या दिवशी शहीद झालेल्या वीरांची गाणी लावणे योग्य असते. म्हणून २६ जानेवारी रोजी असली गाणे लावणे म्हणजे मूर्ख पणाचा शहाणपणा नव्हे का ? असो.आता या लेखामुळे सर्वत्र सुशिक्षित पणा , सुज्ञ ,समजदार पणा येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

शाळांमध्ये-महाविद्यालयात संविधानाबाबद विद्यार्थ्यांस सखोल माहिती द्यावी. पण ते जाणीवपूर्वक टाळले जाते. व देशभक्ती गीते वगैरे लावले जाते.हे मात्र चुकीचे आहे.

प्रजासत्ताक दिनाचे खरे महानायक ठरतात ते भारतीय राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर !
प्रजासत्ताक दिन म्हणजे या दिवसापासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली ह्या संविधानानुसार देश चालतो म्हणजेच देशाचा कारभार संविधानानुसार चालविला जातो. देशात न्यायालये, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री देशातील सर्वच राज्यातील सरकार  हे सर्व संविधानानुसारच कारभार चालवतात. आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अथक कार्यपूर्तता सार्थकी लागली.त्यामुळेच २६ जानेवारीला खूप मोठे महत्व आहे आणि त्यामुळेच २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात ,थाटात, मानाने झेंडा वंदन करून साजरा केला जातो. खरे तर या दिवशी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी तसेच त्यांनी लिहिलेल्या संविधानाचे महत्त्व यावरच शाळा, कॉलेजात नेत्यांच्या किंवा मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सांगितले गेले पाहिजे.तरच २६ जानेवारी हा दिवस साजरा केल्या सारखे वाटेल.आणि झेंडा वंदन करण्याचे सार्थक होईल.

अशा महामानवास आमचे वंदन … जयभीम …जय हिंद .. !

बातमी आवडल्यास नक्की इतरांना शेअर / सेंड करा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here