
भारत पवार … मुख्य संपादक
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : ९१५८४१७१३१
मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रत्येक पक्षाचे नेते आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी नाशिक मध्ये येण्याचा नाद करत आहेत.त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार रतन बनसोड यांच्या प्रचारार्थ नुकतेच नाशकात येऊन पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते की, शिवसेना ठाकरे गटाशी अद्याप नाते जमले नाही सध्या तरी एकमेकांवर फक्त लाइन मारत आहोत एकमेकांस कधी पटू हे आमच्यावर आहे असे प्रेमळ विधान त्यांनी शनिवारच्या दिवशी नाशिक येथे केले होते आणि लाइन मारता मारता सोमवारी लाइन पक्की झाली सुद्धा अखेर प्रेम जुळलेच शिवसेनेने वंचितला पटवलेच… भारतीय राज्यघटनेचे पावित्र्य अबाधित ठेऊन देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहोत अशी घोषणा ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,देशहिताच्या नावाखाली अनेक भ्रम पसरविले जात आहेत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याचा गंभीर आरोप करत देशातील प्रचंड वैचारिक प्रदूषण दूर करून सर्वांनाच मोकळा श्वास घेता यावा हा उद्देश ठेऊन भारतीय राज्यघटनेचे पावित्र्य अबाधित ठेऊन देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी जाहीर केले.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती मुहूर्तावर शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती करण्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून आघाडी बाबतची दोघा पक्षातील कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली होती तर अनेक नेत्यांच्या उलट सुलट चर्चेला उधाण आले होते ते आता थांबणार यात शंका नाही. यावेळी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे या दोन्ही आजोबांचा वैचारिक वारसा पुढे नेण्या साठीच शिवशक्ती – भीमशक्ती एकत्र लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले तर शरद पवार आणि आपले संबंध सर्वश्रुत आहेत असे सांगून ते नव्या प्रयोगासोबत असतील अशी अपेक्षा वंचितचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष देसाई ,खा.संजय राऊत ,वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आदींच्या उपस्थितीत युती सोहळा पार पडला.
