
भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क : 9158417131
मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यात अवैध धंदे सर्वत्र बंद असून मालेगाव येथेही सर्वच अवैध धंदे बंद असल्याने पोलिसांचे याबाबत खूपच दक्षतेने पाऊले उचलली आहेत.तरी सुद्धा छुप्या मार्गाचा अवलंब करून पाहण्यात काय हरकत म्हणून की काय ? मालेगावी एक जण याबाबत छुप्या पद्धतीने रिक्षाने गुटखा घेऊन जात आहे अशी पक्की खबर पवार वाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी लागलीच धाव घेतली. शहरा जवळ असलेल्या दरेगाव नजीक देवीचा मळा भागात १ लाख ७६ हजार रुपयांचा गुटका ताब्यात घेत इजाज मोहंमद युसुफ याच्यावर पोलिसांनी कारवाई करून त्यास जेल मध्ये टाकले.यासाठी त्याने अपे रिक्षाचा वापर केला होता.रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
