अपघात :देवळा नाशिक रस्त्यावर एस टी बसचा चक्काचुर
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा : संपर्क : 9158417131

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा नशिक हायवे रस्त्यावर अपघात घडण्याचे सत्र वाढले असून याबाबत एस टी प्रशासनाने हलगर्जी पणा न करता प्रवाशी आणि चालक यांचा जीव वाचविण्यासाठी सतर्क राहून प्रयत्न केले पाहिजेत असा सबुरीचा सल्ला देवळा आर.पी.आय.आठवले गटाचे तालुका अध्यक्ष कैलास पवार यांनी दिला आहे. आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास देवळा नाशिक रस्त्यावर भावडे फाट्या नजिक साक्री डेपोच्या एस टी बसचा जबरदस्त अपघात झाल्याने बसचा एका बाजूचा पुढील भागाचा चक्काचुर झाल्याने बस होत्याची नव्हती झाल्याचे छायाचित्रात दिसत आहे.त्यामुळे देवळा नागरिकात संतापाची लाट उसळली असून एस टी प्रशासनाने हलगर्जी पणाने न वागता आपल्या बस मध्ये किमान ६० ते ७० प्रवाशी असतात त्यांचा आणि चालकाचा जीव वाचविण्याच्या काम एस टी प्रशासनाची आहे नुसते काम नसून हि फार मोठी जबाबदारी आहे याचे गांभीर्य एसटी प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे असेही कैलास पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी सांगितले की आजचा अपघात इतका भयानक होता की साक्री डेपोच्या एस टी बस ( क्र.MH 20 BL 3149 ) हि बस साक्री येथून नाशिक ला जात असताना देवळा नाशिक हायवे लगत असलेल्या भावडे फाट्या नजीक बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाच्या लक्षात येताच बस थांबविण्याचा प्रयत्न केला त्यात बसचा पुढील भागाचा चक्काचुर झाला असून चालक किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र बस मधील प्रवासी बालम बाल वाचले असून भविष्यातील हि धोक्याची घंटा एसटी प्रशासनाने दूर करावी अशी मागणी देवळा तालुका आर.पी.आय.च्या वतीने करण्यात आली आहे.