पंचायत समितीच्या ढिसाळ नियोजन आणि बेजबाबदार पणामुळे पत्रकार राजेंद्र राऊत यांना आमरण उपोषणास बसावे लागले : भारत पवार,आज उपोषणाचा तिसरा दिवस तिढा कायम मात्र प्रशासनाची पळापळ

0
58

भारत पवार : मुख्य संपादक – कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.मो.9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देशाचा चौथा स्तंभ म्हणजेच  पत्रकार असतो हे सगळ्याच काय आख्या जगाला माहित आहे. ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून पाळला जातो. यादिवशी महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात पत्रकार विविध कार्यक्रम साजरा करून एकमेकांस शुभेच्छा देत आनंद व्यक्त करत असतात. अशा दिवशीच युवा मराठा वेब चॅनलचे संपादक ,संस्थापक राजेंद्र राऊत पाटील यांना मालेगाव पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषणाला बसण्याची वेळ यावी ही मोठी लांचनास्पद आणि खेद जनक बाब असून त्यामुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला जात असून  मालेगाव पंचायत समितीच्या प्रशासनाचा ढिसाळ आणि बेजबाबदार पणाचा मी जाहीर निषेध करतो असे साप्ताहिक  कसमादे टाइम्स आणि महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक , संस्थापक भारत पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधत संपादक पत्रकार भारत पवार यांच्या हस्ते सर्वच पत्रकारांचा पुष्गुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात पुढे बोलताना पवार यांनी सांगितले की , संपादक पत्रकार राजेंद्र राऊत पाटील यांच्यावर आमरण उपोषणाला बसण्याची हि दुसरी वेळ असून तर एकदा स्वतःच्या अंगार पेट्रोल ओतून जिवे मरण्याचा वाईट प्रसंग ओढवला होता या सर्व घटनेचे कारण मालेगाव पंचायत समितीचे गेंड्याच्या कातडीचे पांघरून घेऊन बुद्धी असून बुद्धी नसल्या सारखा कारभार करणारे प्रशासन हेच जबाबदार असून ह्या प्रशासनाच्या बे फीकिरीमुळे ,ढिसाळ नियोजन आणि बेजबाबदार पणाचा कळस गाठल्यामुळेच पत्रकार राजेंद्र राऊत यांना आमरण उपोषणाला बसावे लागले. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील वऱ्हाणे गावातील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जागा पत्रकार भवन बांधण्या साठी रीतसर मागणी राऊत यांनी केली असून या जागेची अफरातफर करण्यात तत्कालीन ग्रामसेविका साळुंखे या जबाबदार असल्याचे आणि त्या दोषी असल्याचे चौकशी अहवाल खुद्द मालेगाव पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी जितेंद्र  देवरे यांनी चौकशी अधिकारी म्हणून नेमलेले विस्तार अधिकारी गुलाब राजबन्सी यांनी चौकशी करून दोषी आढळल्याचे चौकशी अहवालात स्पष्टपणे म्हणून सुद्धा आज पर्यंत दोषींवर कारवाई केली गेली नाही.राऊत यांनी अनेकदा मागणी करूनही आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबूनही संबंधित पंचायत समितीचे अधिकारी राऊत यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरलेत त्यामुळे अधिकाऱ्यांनी पत्रकार राऊत यांचा विश्वासघात केला असून त्यांना पुनश्च पत्रकार दिनी उपोषणास बसावे लागले हे केवळ आणि केवळ पंचायत समितीच्या कर्तव्याचे भान नसलेल्या अधिकाऱ्यांमुळे याही पलीकडे जाऊन ह्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभारामुळे वऱ्हाणे गावच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक महाशयांनी चक्क कारभार चव्हाट्यावर आणून दाखवला तो असा २५ डिसेंबर २०२२ रोजी ख्रिसमस नाताळची सरकारी सुट्टी आणि रविवार असून सुद्धा त्यांनी त्या तारखेचा उतारा चक्क राऊत यांना दिला त्यामुळे कारभार किती भोंगळ आणि कर्तव्याची जाणीव असणारा आगे हे ज्वलंत उदाहरण ग्रामसेवकांनी दाखवून दिले आहे अशा कर्तबगार ग्रामसेवकांमुळे ग्रामपंचायतच्या कारभारात नक्कीच लवकरच पारदर्शकता येणार अशी चिन्हे दिसत आहे त्यामुळे अशा ग्रामसेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे झाले असल्याचे त्यांच्या कारभारावरून दिसते. राऊत यांचे आमरण उपोषण करणे रास्त असून उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून पत्रकार राऊत यांच्या मागणीची आणि उपोषणाची दखल कर्तव्य दक्ष असलेले सध्याचे प्रभारी गटविकास अधिकारी तात्काळ घेतील पत्रकार राजेंद्र राऊत पाटील यांना न्याय देतील व उपोषणकर्त्यास भविष्यात होणारा बाका प्रसंग होऊ देणार नाहीत अशी अपेक्षा संपादक ,पत्रकार भारत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.तर मला गेल्या दोन वर्षांपासून पंचायत समितीचे अधिकारी फक्त आश्वासन देऊन झुलवत राहिलेत त्यामुळे त्यांच्यावरचा असलेला माझा विश्वास उडाला असून आता मी माझ्या मागण्यांवर ठाम असून दोषींना पाठीशी न घालता त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करून आणि  वऱ्हाणे येथील असलेली गावठाणातील जागा पत्रकार भवन साठी दिल्याशिवाय माझे आमरण उपोषण मी सोडणार नाही सत्या साठी मला मरण आले तरी चालेल पण आता मागे हटणार नाही अशी कट्टर भूमिका आपली असल्याचे पत्रकार राऊत पाटील यांनी यावेळी  बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here