रेशन दुकानदार ग्राहकांना रेशन कमी देऊन लूट करतात : दिपक पानपाटील
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती,बातम्या आणि पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.मो.9158417131

देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : देवळा तालुक्यातील रेशन दुकानदारांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढतच चालला असून ग्राहकांना सर्रासपणे लुटण्याचा प्रकार करत असतात.यात सुधारणा नाही झाल्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव दिपक पानपाटील यांनी देवळा नायब तहसिलदार यांना निवेदन देताना म्हटले आहे.
निवेदनात पानपाटील यांनी म्हटले आहे की , धान्य दुकानदारांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या धान्याची पावती दिली जात नाही तर काही दुकानदारांकडून बीपीएल ,अंत्योदय प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना धान्य कमी देतात हि लूट असून हा लुटीचा आणि मनमानी कारभार तात्काळ थांबविणे गरजेचे आहे तसेच रेशन दुकानात माहितीचा फलक बंधनकारक असतो रेशन दुकानाची वेळ ,सुट्टीचा वार ,तक्रार वही , एकूण कार्ड संख्या ,भाव फलक ,फोन नंबर ,पूर्ण पत्ता ई.गोष्ठी माहिती फलकावर लिहिणे आवश्यक असून या सर्व बाबतीत सुधारणा होणे आवश्यक आहे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.