
भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती ,बातम्या आणि पत्रकार नियुक्ती साठी संपर्क करा.मो.9158417131
देवळा : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच धनंजय आनंदा पवार यांनी कर्तव्यात कसूर आणि हयगय केल्याप्रकरणी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पवार यांना अपात्र घोषित केले आहे.त्यामुळे संपूर्ण बागलाण तालुक्यात ह्या निकालाने खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी की,तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक यांनी सरपंच धनंजय पवार यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाची चौकशी केली असता पवार यांनी कर्तव्यात कसूर व हयगय केल्याचे आढळल्याने त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार सखोल चौकशी करण्याची विनंती विभागीय आयुक्त ,नाशिक यांचे कडे केली होती.त्यानुसार आयुक्तांनी सखोल चौकशी केली असता सन २०१९- २०२० मध्ये १४ वा वित्तआयोग अंतर्गत मंजूर आराखड्या प्रमाणे विकास कामे न करणे आणि सन २०१६ – १७ मधील १४ वा वित्तआयोग अंतर्गत केलेल्या भूमिगत गटारीचे कामे तोडून पुन्हा सन २०१९ – २०२० या आर्थिक वर्षात नव्याने कामे केल्याचे आढळून आल्याने सरपंच धनंजय पवार यांनी कर्तव्यात कसूर व हयगय केल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार सखोल चौकशी करून सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या निकालात म्हटले आहे. त्यामुळे ह्या घटनेने बागलाण तालुक्यात खळबळ माजली असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंचांना ह्या निकाला मुळे मोठा पायबंद बसेल अशी चर्चा नागरिकात होत आहे तर अशा सरपंचांना चापच बसणार अशी चर्चा तरुणांमध्ये होत आहे.
