Home शैक्षणिक पुणे विद्यापीठाचे आवाहन ई.१०वी , १२वी च्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा...

पुणे विद्यापीठाचे आवाहन ई.१०वी , १२वी च्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा ऑनलाइन

0
104

ओझर / नासिक – ता.२०.कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “- वि.संपादक -पाठक , यांज कडून – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात येणार आहे, ई.१० वी व ई.१२ वी परीक्षेत बसणाऱ्या नियमित , रिपीटर ( पुन्हा बसणारे) विधयार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर भरने आवश्यक असल्याचे पुणे विद्यापीठ राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे दिल्याची माहिती ओझर(मिग) येथील ज्युनिअर ,सायन्स कॉलेजचे प्राचार्य पाठक यांनी दिली. संकेतस्थळावर दिलेल्या तारखांनाच माहिती भरली जाईल,पुढील प्रमाणे–

नियमित शुल्क अर्ज – ता.२०/१०/२०२० ते २९/१०/२०२० , विलंब शुल्क अर्ज – ता.३० / १०/ २०२० ते ता.२/११/२०२० पर्यंतच भरले जातील तर बँकेत चलन भरणे ता.३ / ११/ २०२० ते ४/११/२०२०

सदर परीक्षेचे अर्ज विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा / कॉलेज मार्फतच भरावीत असेही शेवटी सांगण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here