देवळा : ज्ञानाचे अथांग महासागर असलेल्या ” विश्वरत्न ” तथा ” भारतरत्न ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
2
Oplus_131072

भारत पवार  : मुख्य संपादक  : ९१५८४१७१३१
🎤 देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क .

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एकमेव उत्कृष्ट शिक्षण सेवा देणारी  देवळा एज्युकेशन सोसायटीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सगळ्यात प्रथम उत्साहात साजरी करण्यात आली.
✒️……………………………………………………………………..
देवळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन करत आज दि. १४ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे आदरणीय चेअरमन तथा प्राचार्य डॉ.हितेंद्र (बापूसाहेब) आहेर, प्रशासकीय अधिकारी प्रा.बी.के.रौंदळ सर , उपप्राचार्य डॉ.डी.के.आहेर सर , डॉ.जयवंत भदाणे सर , उपप्राचार्य आर. एन. निकम, मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पगार मॅडम , मुख्याध्यापक श्री. एस.ए.पगार सर, प्राचार्या लिना अहिरराव मॅडम ,पर्यवेक्षक श्री. कौतिक खोंडे सर व पर्यवेक्षिका सौ.मनिषा आहेर मॅडम यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या मनोगतातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला.यात गायत्री अहिरे (इ. ५ वी), प्रांजल सोनवणे (इ. ६ वी), सिद्धी निकम (इ. ७ वी), रोहिणी बागुल (इ. ९ वी), तन्मय गांगुर्डे (इ. ८ वी) व स्वरूप ठोंबरे (इ. ७ वी) यांनी प्रभावी भाषणे सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पगार मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले.यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी कला शिक्षक श्री.भारत पवार सर यांनी आकर्षक फलक लेखन साकारले.
हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ✨🙏बाबासाहेब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here