भारत पवार : मुख्य संपादक देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ( ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क ) :
भावडे येथील एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपली कौशल्य, शिस्त आणि संघभावना दाखवून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून युथ एशियन गेम ब्राँझ मेडलिस्ट भूमिका नेहते, सिद्धार्थ वाघ राष्ट्रीय प्रशिक्षक , सार्थक नेहते (पोलीस निरीक्षक देवळा पोलीस स्टेशन ) , संजय देवरे (अध्यक्ष एस.के.डी.स्कूल ) , सेक्रेटरी मीना देवरे, प्राचार्य एस.एन. पाटील तसेच गंगा बापू मोरे, रोशन मोरे मंचावर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्च पास्ट सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना येलो हाऊस, रेड हाऊस, ग्रीन हाऊस, ब्ल्यू हाऊस या विभागात विभागले गेले विद्यार्थ्यांनी धावणे, रिले रेस,लांब उडी, उंच उडी,बुक बॅलन्सिंग,गोळा फेक, संगीत खुर्ची, डंबेल्स रनिंग, स्विमिंग, टग ऑफ वॉर, हॉलीबॉल, क्रिकेट,कबड्डी इत्यादी क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे भूमिका नेते व सिद्धार्थ वाघ यांनी आपल्या मनोगतातून खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त,आत्मविश्वास व संघ भावना वाढते, असे सांगून सर्व विजयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व स्पर्धांसाठी विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख मुदस्सर सय्यद, तसेच राजू देवरे, ययाती जाधव ,किरण चव्हाण,मंजुषा शेवाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीरित्या पार पडलेल्या स्पर्धांना विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






