भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : महाराष्ट्र न्यूज. आपल्या बातम्या , परिसरातील घडामोडी काही सेकंदात महाराष्ट्रभर पोहचविण्या साठी तात्काळ संपर्क साधावा. संपर्क : ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : तालुक्यातील पाणीप्रश्न कायम स्वरुपी सोडविण्या साठी लोकप्रिय आमदार डॉ.राहुलदादा आहेर यांनी आमदार आपल्या गावी ही संकल्पना साक्षात उतरविण्यासाठी जलसमृद्धी अभियान त्यांनी हाती घेतले. देवळा तालुक्यातील गावोगावी स्वतः जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.त्यामुळेच त्यांनी ८जानेवारी ०२६ गुरुवार पासून दौऱ्याचे आयोजन केले असून त्या त्या गावातील सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आ. डॉ.राहुलदादा आहेर यांनी केले आहे. दौरा याप्रमाणे _ गुरुवार दि. ८ जाने. सकाळी १० . ०० वा.देवळा तहसील कार्यालय , दुपारी १२ वा. कनकापूर ग्रामपंचायत कार्यालय , दु. १ . ०० वा. खर्डे ग्राम.पं.कार्यालय , दु. २. ०० वा. वाजगाव ग्राम.पं. कार्यालय , दु. ३ . ०० वा. वडाळा श्रीरामंदिर , दु. ४ .०० वा. भावडे मारुती मंदिर , सायं. ५ .०० वा. कापशी ग्राम.पं.कार्यालय . याप्रमाणे दौरा असून पाणी प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी ह्या दौऱ्याचा लाभ घेऊन पाण्याची गंभीर समस्या सोडविण्याची ह्या संधीचा लाभ घेऊन नेमक्या आपल्या समस्या काय त्या कशा मार्गी लागणार याबाबत आ. डॉ.राहुलदादा आहेर यासाठी प्रयत्नशील असल्याने त्यांनी आमदार आपल्या गावी ही संकल्पना घेऊन आपल्या गावी येत असल्याने ” जलसमृद्धी अभियान ” हाती घेतले आहे आणि ह्या अभियानातून तालुक्यातील पाणी प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावणार असल्याचे त्यांनी क.टा. महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.





