भारत पवार : मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आणि आपल्या परिसरातील घडामोडी काही सेकंदात महाराष्ट्रभर पोहचविण्या साठी तात्काळ संपर्क साधावा. संपर्क : ९१५८४१७१३१ देवळा : क. टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क ; _ बॉल बॅडमिंटन स्पर्धेत व्हि. के.डी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुलींच्या संघाची यशस्वी गरुड झेप जळगाव येथे जाऊन जळगावलाच ” गार ” करून चकदार कामगिरी करून हि झेप घेतल्याने मुलींची राज्यस्तरावर निवड करण्यात आली.त्यामुळे देवळा तालुक्यात मुलींचे व क्रीडा शिक्षक निलेश भालेराव , आकाश वाडीले यांचे जोरदार कौतुक केले जात आहे.तर संस्थेचे चेअरमन संजय देवरे , सेक्रेटरी मीना देवरे , प्राचार्य एन. के.वाघ आदींसह सर्व शिक्षकांनी जोरदार अभिनंदन केले.
जळगाव एम.जे. कॉलेज येथे पार पडलेल्या शालेय विभागस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत व्हि.के.डी.इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या भावडे, येथील 14 वर्षीय मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत, अंतिम सामन्यात जळगाव ग्रामीण संघाचा दणदणीत पराभव करून, राज्यस्तरासाठी पात्र ठरले. विजयी संघात अनिशा मोरे, समृद्धी देवरे, ईश्वरी काकुळते,सृष्टी रौंदळ, जान्हवी बच्छाव, तन्वी देवरे,अक्षरा मोरे, अनुष्का बच्छाव, ईश्वरी भामरे, हर्षदा सावकार या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक निलेश भालेराव,आकाश वाडीले यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी झालेल्या संघाला संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सेक्रेटरी मीना देवरे,विद्यालयाचे प्राचार्य एन.के. वाघ तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे, सागर कैलास, हेमंत शिंदे यांनी कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा.





