Home Breaking एसकेडी विद्यालयात पोक्सो कायद्याविषयी अंकिता इप्पर यांचे मार्गदर्शन , मुलींनी अत्याचार….. वाचा...

एसकेडी विद्यालयात पोक्सो कायद्याविषयी अंकिता इप्पर यांचे मार्गदर्शन , मुलींनी अत्याचार….. वाचा सविस्तर ….

0
42
Oplus_131072

भारत पवार : मुख्य संपादक                                     आपल्या परिसरातील घडामोडी , बातम्या अगदी काही सेकंदात महाराष्ट्रभर पोहचविण्या साठी तात्काळ महाराष्ट्र न्यूज  शी संपर्क साधावा .. ..संपर्क :  ९१५८४१७१३१                                                       देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  मुलींनी अत्याचाराचा विरोध वेळीच करायला हवा असे अंकिता इप्पर यांनी सांगितले.

Oplus_131072
Oplus_131072

एस.के.डी इंटरनॅशनल स्कूल व व्हि.के.डी.विद्यालय भावडे येथे सखी सावित्री समिती अंतर्गत विद्यार्थीनि सुरक्षा, पोक्सो कायदा व लिंग समानता या विषयांवर आधारित जागरूकता शिबिर मुलींसाठी आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी अंकिता इप्पर यांनी विद्यार्थिनींना सखोल मार्गदर्शन केले. प्रतिबंध समावेशक आणि लिंगनिरपेक्ष वातावरण निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जबाबदार नागरिकत्वाचा विकास या विषयावर देखील मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरादरम्यान अध्यक्षस्थानी संस्थेच्या सेक्रेटरी मीना देवरे तसेच समवेत एस. के.डी.विद्यालयाचे प्राचार्य एस. एन.पाटील, व्हि.के.डी. विद्यालयाचे प्राचार्य एन.के.वाघ आदी उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थिनींच्या शंकांना अंकिता इप्पर यांनी समाधानकारक मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी व्हि.के.डी. विद्यालयाच्या शिक्षिका वंदना जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीरित्या पार पडलेल्या शिबिराचे संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे यांनी कौतुक केले. शिबिरासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here