भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक नगरपंचायत , पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगर पालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी कमी वेळेत गण, गटातील आणि प्रभागातील अधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आपण दिलेली बातमी , मुलाखत , जाहिरात मतदारांच्या घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात कायम राहण्यासाठी आजच संपर्क साधा. मो. ९१५८४१७१३१ देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुनर्जीवन प्राप्त करून देऊन शेतकऱ्यांना आनंदादायक दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने कालच्या बैठकीत घेतल्याने आपण महाराष्ट्र शासनाचे व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे प्रशासक श्री. विद्याधर अनासकर यांचे आभार व अभिनंदन करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी महाराष्ट्र न्यूज ला कळविले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की,
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनर्वसनासाठी, बँकेचा तोटा कमी करून शेतकऱ्यांना पुढिल दोन वर्षांपकरित पिख कर्ज वाटप सुलभ करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६७२ कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यास मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे,सदर अर्थसहाय्यामुळे जिल्हा बँकेला आर्थिक पुनर्बाधणी व नव्याने पुनर्ंभाडवलीकरण उभं करून जिल्हा बँक परत एकदा सुस्थितीत आनुन शेतकऱ्यांची अर्थ वाहिनी सक्षम करण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयांचे आम्ही स्वागतच करू, परंतु मागील दहा वर्षात झालेला गैरव्यवहार आणि अनागोंदी तसेच बेकायदेशीर नोकर भरती व इतर गैरकारभाराचे काय? ज्यांनी सत्तेचा गैरवापर करून कोट्यवधी रुपये लाटले व थकवले व जिल्हा बँक खड्यात घातली,अशा हेविवेट थकबाकीदारांच्या आर्थिक चौकशीचे काय? का त्यांनाही क्लिनचीट देण्याचं राज्य सरकारनं धोरण आहे की काय? अशी शंका सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे प्रशाशक श्री विद्याधर अनासकर यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६७२ कोटी रुपयांचा बुस्टर डोस मिळवून दिला असेही जाधव यांनी शेवटी म्हटले.





