भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी रोखठोख बिनधास्त संपर्क करा. ९१५८४१७१३१
मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : येथील महानगरपालिकेत लोककल्याण मेळावा नुकताच संपन्न झाला. मनपाचे आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांचे मार्गदर्शनानुसार केंद्र शासन पुरस्कृत प्रधान मंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत अति आयुक्त श्री गणेश शिंदे यांचे अध्यक्षतेखाली मालेगाव महानगरपालिका सभागृहात लोक कल्याण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान पल्लवी शिरसाठ उपायुक्त DAYNULM मनपा यांनी मेळाव्या प्रसंगी सर्वांना सूचना दिल्या. यावेळी मालेगाव पथविक्रेता समितीचे सदस्य, सुनील चांगरे, जगदीश गोहे, शेख सादिक, फारूक फिर्दोसी, शेख सलमान, दिनेश ठाकरे, महादेव साबने, रामचंद्र देवरे, मालेगाव शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापक उपस्थित होते. दि. १७/९/०२५ ते २/१०/०२५ पर्यंत लोक कल्याण मेळावा सर्वत्र घेण्यात यावा असेही सांगण्यात आले.
याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत 3 आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत 3 लाभार्थी अशा ६ लाभार्थ्यांना योजनेचे धनादेशचे वाटप करण्यात आले .तसेच PMSvanidhi योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे प्रलबीत कर्ज प्रस्ताव लवकर निकाली काढावेत अशा बँकाना सूचना दिल्या. मेळाव्यात रोजचे नियोजन कसे असावे याबाबत डॉ. संदिप आगोणे, शहर व्यवस्थापक, मनपा यांनी मार्गदर्शन केले तर FSSAI व इतर योजनेबाबत श्री. रोहित कन्नोर यांनी मार्गदर्शन केले. विभागातील सर्व समुदाय संघटक यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार संकीर्ण कर विभागाचे अधीक्षक श्री. रमाकांत धामणे यांनी मानले. आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली.





