Home Breaking शिवनिश्चलच्या भरगच्च गर्दीने उपस्थितांचे मने जिंकली , तुम्ही काम करत रहा आमची...

शिवनिश्चलच्या भरगच्च गर्दीने उपस्थितांचे मने जिंकली , तुम्ही काम करत रहा आमची शक्ती तुमच्या पाठीशी : शरद पवार

0
69
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक.                      जाहिराती , बातम्यांसाठी बिनधास्त संपर्क करा : ९१५८४१७१३१.                                                      देवळा : कटा  महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : (देवळा महाविद्यालयाच्या प्रांगणातून  ) _ शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे मदतनिधी उपक्रम व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता ह्या समारंभास अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.                 तुम्ही काम करत रहा आमची शक्ती चांगल्या कामासाठी तुमच्या पाठीशी राहणार असे गौरोद्दगार खा.शरदचंद्र पवार यांनी यावेळी काढले. यापूर्वी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट विषयी ऐकीव माहिती होती परंतु आज ईथे आल्यावर प्रत्यक्ष पाहण्यास मिळाले याचा मला आनंद आहे. असेही पवार यांनी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या कार्यक्रमाप्रसंगी देवळा येथे बोलतांना सांगितले.ह्या ट्रस्टच्या सर्व सदस्यांना त्यांनी धन्यवाद दिले. तर महाराष्ट्रात सिंधुताई सपकाळ यांच्या नंतर उत्कृष्ट काम शिवनिश्चल सेवाभावी चे दिसते असे खा.सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. अनाथांचा नाथ बनणे सोपे नाही ते यशवंत गोसावी यांनी करून दाखवले. जयवंतराव पाटील यांनी खरोखर हिरा शोधला असंही खा.सुप्रियाताई यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रकार  विलास बडे , आ जयंत पाटील , खा.भास्कर भगरे , खा.निलेश लंके आदींची भाषणे झाली .तर उपस्थित मान्यवरांच्या प्रत्येकाच्या ऋणात  मी राहीन अशी ग्वाही यशवंत गोसावी यांनी या निमित्ताने आभार व्यक्त करताना दिली.                                                 कार्यक्रमास दादासाहेब सूर्यवंशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे, देवळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य हितेंद्रबापू आहेर , सरचिटणीस प्रा. मालतीताई आहेर , राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) गटाचे देवळा तालुका अध्यक्ष  पंडितबापू निकम ,  डॉ. व्ही एम (बापू) निकम ,  मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे , मविप्र संचालक विजयनाना  पगार , भाऊसाहेब पगार  , मालेगाव येथील बंडूकाका बच्छाव आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072
 शिवनिश्चल कार्यक्रमास उपस्थित असलेले श्रुती ( कटा. महाराष्ट्र न्यूज चित्र  सेवा )
( कटा महाराष्ट्र न्यूज चित्र सेवा) 
( पत्रकार विलास बडे भाषण करताना दुसऱ्या छाया चित्रात उपस्थित महिला . कटा महाराष्ट्र न्यूज चित्र सेवा) ९१५८४१७१३१

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here