Home Breaking शिक्षणाधिकारी मुळे शिक्षण क्षेत्राला काळीमा : तिघे बडे मासे पोलिसांच्या जाळ्यात अलगद...

शिक्षणाधिकारी मुळे शिक्षण क्षेत्राला काळीमा : तिघे बडे मासे पोलिसांच्या जाळ्यात अलगद , मै भी खाऊंगा तुमकोभी खिलाऊंगा ” मलाई ” मारके ! पापाचे घडे भरले अखेर जेल मध्ये बसले, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, सुधीर पगार, उदय देवरे यांना पोलिसांनी तुरुंगात टाकले तर देवळा आणि मुंजवाड शाळे संदर्भातील तक्रार गुलदस्त्यात त्याबाबतही भांडाफोड होणारच !_ तक्रारदार

0
101
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक  , विलास माळी : राज्य उपसंपादक                                         परखड , निर्भीड , सडेतोड बातमी आणि जाहिराती साठी बिनधास्त    संपर्क करा . मो ९१५८४१७१३१                               मालेगाव ; कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कोणीही असो आपणास मिळालेला अधिकारी त्याचा योग्य निर्णायक वापर केल्यास नक्कीच आपबीती  पासून तो अधिकारी कोसो दूर असतो. अन्याय झाला तर योग्य न्याय मागण्यासाठी तक्रारदार न्याय मागण्यासाठी संबंधित अधिकार असलेल्या अधिकारी कडे जाणारच.मग त्या कोणीही अधिकाऱ्याने त्या तक्रारदाराचा आणि त्याच्या तक्रारीचा गैरफायदा घेऊ नये आणि जर घेतलास तर पापाचे घडे भरण्यास सुरुवात नक्कीच होते मग त्याला हे कळत नाही की आपण तक्रारदारांवर अन्याय करतो म्हणजेच माया घेऊन पोटकल्याण  हे पाप नव्हे काय ? पापच करतो.                                                   नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि त्यांच्या साथीदारांना अटक केल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजल्याने पवित्र शिक्षण क्षेत्राची अब्रू ह्या अधिकाऱ्यांनी चव्हाट्यावर आणल्यामुळे शिक्षण क्षेत्रात काळीमा फासला गेला त्यामुळे ह्या अधिकाऱ्याने ज्यांच्या वर अन्याय केला त्यांच्यात संतापाची लाट उसळली असून आता भोगा पापाची फळ अशी दुवा तक्रार करते देत असल्याचे मालेगाव भागात समजले.                        नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या स्कूल भरती व य.ना. जाधव फुले शिक्षण संस्था संगमेश्वर येथील बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात येथील पवारवाडी  आणि छावणी पोलिस ठाण्यात संबंधित मेन मोरखा जिल्हा शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, जिल्हा उप शिक्षण अधिकारी सुधीर देवरे आणि कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यासंदर्भात मंगळवार दि. ९/९/०२५ रोजी रात्री उशिरा ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जोरदार कारवाई केली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २७ जुलै २०२५ रोजी पवारवाडी पोलिस ठाण्यात जिल्हा परिषद नाशिक येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण श्रीधर पाटील ( ५०) , कार्यालयीन अधीक्षक सुधीर भास्कर पगार ह्या दोघांविरुद्ध आणि दि. १३ एप्रिल २०२५ रोजी छावणी पोलिस ठाण्यात उपशिक्षण अधिकारी उदय विठ्ठलराव देवरे ( ५२) यांचे विरोधात गुन्हा दाखल झाल्याने २७ जुलै रोजी पवारवाडी पोलिस ठाण्यातील दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने केलेल्या तपासात मालेगाव हायस्कूल मधील बॅक डेटेड शिक्षक भरती प्रकारात अंजन तुलबा संस्थेच्या १३ शिक्षकांच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा परिषदेचे संशयित आरोपी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण श्रीधर पाटील आणि कार्यालय अधीक्षक सुधीर भास्कर पगार यांना अटक केली. तर य. ना. जाधव फुले शिक्षण संस्था संगमेश्वर येथील ११ शिक्षकांच्या भरती घोटाळ्यात उपशिक्षण अधिकारी यांचा उदय झाला.आणि उपशिक्षण अधिकारी उदय विठ्ठलराव देवरे यांनाही अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू सुर्वे हे करीत आहेत.                                                   आर्थिक साटेलोटे करून पोट कल्याण करण्यात जोरदार पटाईत  असलेले जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांचा हात कोणीही धरू शकत नाही हे त्यांनी केलेल्या आजवरच्या घडामोडींवरून दिसते. देवळा तालुक्यातील देवळा येथील आणि बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील शाळांविरुद्ध पुरावे सह तक्रार अर्ज दाखल करून आज मीतीस सुमारे दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लोटला गेला आर्थिक अमिषापोटी देवळा येथील शाळे संदर्भातील असलेल्या तक्रार अर्जावर दोन वेळा आमने सामने बोलावून चौकशी केली आणि तिसरी तारीख कळवतो असे तक्रारदारास सांगून आज जवळ जवळ अडीच वर्षे चा पुढील कालावधी झाला पण तारीख न देता थांबून ठेवले अर्थात येथे पोटकल्याण करून घेतले असणारच याची शक्यता नाकारता येत नाही.कारण यांचे कारणामे यांचा भोंगळ कारभारावरून लक्षात येतेच तर बागलाण तालुक्यातील मुंजवाड शाळेच्या संदर्भात सुद्धा पुराव्यासह तक्रार माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांचे कडे दाखल केली असता त्यांनी फक्त संबंधित शाळेला खुलासा कळवा असे लेटर दिले.त्या प्रकरणास सुद्धा दोन वर्ष होत आली सबंधित शाळेने खुलासा केला की नाही ? ते सुद्धा तक्रार दारास आज पर्यंत कळवले गेले नाही त्या तक्रारीस सुद्धा दोन वर्षे होत आली पण कार्यवाही काहीच नाही. यांनी पोटकल्याण करून घेतले असणार त्याशिवात हा जीव शांत होणारच नाही.साहजिक आहे. मग हे अस पाप बाहेर पडते . फेडावे तर लागणारच परंतु आपल्यास मिळालेला अधिकार  तो तक्रार दारांच्या न्याय भूमिकेसाठी कधी वापरणार ? रिटायर झाल्यावर की अशी आप भीती झाल्यावर ? प्रश्नच आहे.सगळ्याच बाबतीत पैसा हा परमेश्वर नसतो. हे कधी कळणार ? ह्या पापभीरूना ?   म्हणताना भगवान के घर देर है , अंधेर नहीं ! त्याप्रमाणे देवळा आणि मुंजवाड शाळे संदर्भातील न्यायास अजून वेळ गेली नाही .योग्य न्याय तर देणे गरजेचे आहेच.कारण पुरावे दिले आहेत. आणि जर न्याय मिळालाच नाही हिच तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत दाखल करणार यात शंका नाही. मग किती अधिकारी  किती शिक्षक अडकणार हे काळच ठरवणार. शिक्षणाधिकारी  प्रवीण पाटील आणि त्यांना सहकार्य करणारी त्यांची टीम   यांना घोटाळा माफिया म्हणावे की आर्थिक माफिया यांनी देवळा व मुंजवाड शाळेचे प्रकरण आजपर्यंत गुलदस्त्यात ठेवले असे असले तरी हा गुलदस्ता त्यांना रिकामा करावाच लागणार हे प्रकरण  हळू हळू  उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपुढे नेणार पण न्याय घेणार असे पत्रकार भारतराज पवार यांनी यावेळी  म्हटले.

नुकतेच एका भरती प्रकरणी जिल्हा शिक्षणअधिकारी प्रवीण पाटील यांनी शासनास सुद्धा चुना लावण्यास मागे हटले नाही . शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे  प्रशासनाने त्यांचे कडील अधिकार काढून घेतला होता.पाटील यांनी लगेचच मॅट मध्ये जोराची धाव घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी पद पुन्हा स्वतः कडे खेचून घेण्यात सराईत ठरले. यांचे बरेचसे किस्से असे सांगता येतील.वेळ येईल तेव्हा सांगणारच. परंतु वेळ येण्या आधी देवळा आणि मुंजवाड शाळेविषयी मागणी प्रमाणे योग्य न्याय देण्यास पाटील यांनी योग्य भूमिका घेतली किंवा त्यांचे जागी अन्य जिल्हा शिक्षणाधिकारी आल्यास त्यांनी वरील संदर्भातील योग्य न्याय भूमिका पार पाडल्यास स्वागतच राहणार. यात शंका नाही. वाटते की , असे भ्रष्ट अधिकारी ठेवण्यापेक्षा तुकाराम मुंढें सारखे अधिकारी शिक्षण खात्याकडे ठेवल्यास शिक्षणखात्याची प्रतिमा नक्कीच उंचावेल हे प्रशासन व सरकार सुद्धा मान्य करणार. पण त्यासाठी सरकार सुद्धा खंबीर असावे लागते. हे सत्य नाकारून कसे चालणार ?                       प्रवीण पाटील यांच्या कारनाम्यानुसार सांगावेसे वाटले की , मै भी खाऊंगा तुमको भी खीलाऊंगा मलाई मार के ! हे तिघे बडे मासे पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकल्याने आता ह्या बड्या माशांची मलाई चांगलीच अंगाशी येणार हे नक्की. याच्याही पलिकडे जाऊन प्रवीण पाटील, उदय देवरे आणि सुधीर पगार यांच्या मालमत्तेची चौकशी करणे तितकेच महत्वाचे ठरेल.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here