भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१ मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : शिक्षक दिन नुकताच संपन्न झाला. बऱ्याचशा शिष्यांनी आपल्या गुरुजनांना मिडिया वरून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.
परंतु मालेगावी मंत्रीच चक्क गुरुचरणी नतमस्तक होऊन आस्थेने विचारपूस करत आशीर्वाद घेतल्याने कुतुहल व्यक्त केले जात आहे. एरवी गुरु ( गुरुजी ) दिसल्यावर वरवर नमस्कार करून काढता पाय घेतो.सध्यातरी अशी अवस्था झालीय .पण यास अपवाद ठरलेत मंत्री साहेब. या शिष्याच्या आदर्शाची चर्चा पंचक्रोशीत सुखद आश्चर्याचा धक्का देत असून असा मंत्री होणे नाही असे चर्चिले जात आहे.
शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी शाळेत जायचं नाही असा विश्वास मनाशी बाळगत त्यामुळे मनातल्या मनात आनंदित होत असे. परंतु आपल्या पोटच्या गोळ्याला शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी शिकून मोठ व्हावे असे स्वप्न साकार करण्यासाठी काही कळायच्या आत आई घरातून बाहेर येत माझे खवाटे पकडून शाळेत घेऊन येत मास्तर , याले हाणीमारीसन का होईना पण चांगलं तयार करा अशी कठोर भूमिका घेत बजावणारी आई …. आणि तेवढ्याच कडक शिस्तीने आपल्या या शिष्यास शिस्त आणि शाळेची गोडी लावणाऱ्या या शिक्षकाचा हा शिष्य पुढे महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री होतो …. किती भाग्यवान ते गुरू आणि किती व कसा तो आदर्श शिष्य …. !
मालेगाव नगरपालिकेच्या शाळेत इयत्ता पहिलीला मला घरच्यांनी टाकले. मात्र काहीही समजत नसल्यामुळे अर्ध्या रस्त्यावरून घरी येऊन जायचो.परंतु आई माझे खवाटे पकडून डायरेक्ट तुमच्याकडे घेऊन यायची आणि म्हणायची की मास्तर याले हाणीमारीसन का होईना पण चांगलं तयार करा. तुम्ही म्हणायचे माझ्या भरवशावर सोडा ……
गुरुजी , वरील संवादाची आजही राजकीय , सामाजिक जीवनात वावरताना शाळा , शिक्षक म्हटले की मला आवर्जून आठवण होतेच. तुम्ही हक्काने आवर्जून सांगायचे की , चांगला अभ्यास करा , शिक्षण घेतले तरच तुमची प्रगती होईल .याचा प्रत्यय आज पावलो पावली येत असतो माझ्या आई _ वडिलांबरोबरच महत्वाचे गुरू ( गुरुजी _ शिक्षक ) सुदाम चव्हाण हेच माझ्या यशाचे खरे मानकरी यांचेच मोलाचे योगदान आहे.शिस्त , प्रामाणिकपणा तसेच लोकसेवेची आवड यांच्या शिकवणीतूनच मिळाल्याचे दादा आजचे दादासाहेब आवर्जून सांगतात. तुमचा छडी चा मार असो की कायमच पाळणारा कान असो आजही त्याचे स्मरण होतेच. तुम्ही दिलेल्या संस्काराची शिदोरी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरतेय.तीच संस्कारुपी आणि शिक्षणरुपी शिदोरी महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी , विद्यार्थिनींना आणि शिक्षक व शिक्षिकांना मार्गदर्शक ठरणार यात शंका नाही.
माझ्या शिक्षणातील आठवणीत पहिली ते दहावी असो की पुढे इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि मग सरकारी खात्यात अभियंता म्हणून नोकरी आणि मग राजकीय प्रवासाला सुरुवात केली सलग पाच वेळा आमदार आणि सलग दोन वेळा कॅबिनेट मंत्री आणि सध्या शिक्षण खात्याचे शिक्षण मंत्री पद भूषविताना तुमची शिवण कामी येत आहे. आपल्याला प्राथमिक शिक्षणाचा पाया भरणाऱ्या या गुरूची आस्थेने भेट घेणे आणि आदराने चौकशी करत वेळोवेळी येऊन प्रत्यक्ष भेटून चरणी नतमस्तक होत असतो. आजही तुमच्या घराजवळून जाताना दररोज आदरयुक्त भीती वाटत असते. _______ आठवणीतील ,


तुमचा : दादा ( आजचा दादा साहेब भुसे )





