भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक. आपल्या परिसरातील परखड आणि सडेतोड बातम्या , जाहिराती देऊन काही सेकंदात महाराष्ट्रातील घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी संपर्क : 9158417131. मालेगाव : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब न्यूज चॅनल : ( शंकर डोंगरे ) _
स्वातंत्र्यपूर्व काळापासून होमिओपॅथिक डॉक्टर महाराष्ट्रभर ग्रामीण तसेच शहरी भागात अल्पदरात आरोग्य सेवा पुर्वत आला आहे. तसेच आजार बळावूण रुग्ण शहरांत मोठ्या रुग्णालयात भरती होण्यापासून रोखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
शासनाने ग्रामीण तसेच शहरी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांना मॉडर्न फॉर्माकोलॉजी-ॲलोपॅथी (CCMP) हा कोर्स प्रत्येक MBBS कॉलेजला ८ वर्षांपासून दिला आहे.
महाराष्ट्र शासन हा कोर्स उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांची रजिस्ट्रेशनची नोंद उशीराने का होईना पण महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये दिनांक १५ जुलै पासून करणार आहे.
परंतू MBBS व BHMS या शाखांच्या अभ्यासक्रमातील फॉर्माकोलॉजी सोडता सर्व विषय सारखे आहेत. त्यात आता शासनाने आरोग्य विज्ञान विद्यापीठा व्दारे CCMP हा ब्रिज कोर्स होमिओपॅथिक डॉक्टरांना MBBS कॉलेज मध्ये देवून ती उणीव सुध्दा पुर्ण केली आहे.
दोघ शाखांचा अभ्यासक्रम इंटर्नशिप सहीत साडेपाच वर्षांचा आहे. त्यात होमिओपॅथिक डॉक्टरांच CCMP कोर्सच एक वर्षाच शिक्षण वाढून ते तब्बल साडेसहा वर्षांच झाले आहे.
शासन आदेश झुगारून आय.एम.ए. ही संघटना एम.एम.सी. मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन होण्यास विरोध करत आहे.
शासन आदेशान्वये १५ जुलै पासून होमिओपॅथिक डॉक्टरांची एम.एम.सी. मध्ये नोंद लवकरात लवकर व्हावी म्हणून महाराष्ट्रभर अशा स्वरूपाचे निवेदन दिले जात आहे. त्याप्रमाणे मालेगांव तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेने प्रांताधिकारी नितीन सदगीर यांना निवेदन दिले. १५ जुलैला एम.एम.सी. मध्ये नोंद न झाल्यास १६ जुलै पासून आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
प्रांताधिकारी नितीन सदगीर यांना निवेदन देताना मालेगांव तालुका होमिओपॅथिक असोसिएशनचे सचिव डॉ.सचिन बोरसे, अध्यक्ष-डॉ. प्रभाकर सिरसाठ, उपाध्यक्ष-डॉ.बबन सुर्यवंशी
समवेत जेष्ठ डॉक्टर डॉ.संजय बेंडाळे, डॉ. मधुसुदन अग्रवाल, डॉ.चंद्रकांत पवार, डॉ.अविनाश सुर्यवंशी, डॉ.रमेश गव्हाणे डॉ.विष्णू पाटील, डॉ.प्रल्हाद सुर्यवंशी, डॉ.मेघ:शाम ठाकरे, डॉ.सुशांत निकम, डॉ.राजेंद्र माळी, डॉ.चंद्रशेखर पवार, डॉ.केशव खैरनार, डॉ.दलवीर राजपूत, डॉ.दिपक लाडे, डॉ.उमेश निकम, डॉ.संदिप चव्हाण, डॉ. गौरव बेंडाळे आदी उपस्थित होते.





