Home Breaking रेकॉर्ड ब्रेक गर्दी : गरीब मुला मुलींच्या शिक्षणाचा व त्यांचा लग्नाचा खर्च...

रेकॉर्ड ब्रेक गर्दी : गरीब मुला मुलींच्या शिक्षणाचा व त्यांचा लग्नाचा खर्च करणार भीम महोत्सव कार्यक्रमात प्रविणभाऊ राऊत यांची घोषणा

0
112
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक.                       महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संतोष आकटे – विभागीय संपादक , डोंबिवली  : 8879270016 , 9158417131                                                       बदलापूर (ठाणे ) , घोरपडे मैदानावरून : भारतराज पवार , संतोष आकटे – कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल आणि न्यूज पेपर नेटवर्क :  आर्थिक परिस्थिती नसलेल्या अशा गरीब मला मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा सर्व खर्च आम्ही करणार असल्याची घोषणा बहुजन युवा नेतृत्व प्रविणभाऊ राऊत यांनी भिम महोत्सव कार्यक्रमात केली.यावेळी मैदानावर लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावर्षी कार्यक्रमास रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमल्याने “ गर्दी ” हा चर्चेचा  आणि कुतूहलाचा विषय उपस्थितांमध्ये रंगला होता.

प्रगतशील बौद्ध समाज बदलापूर शहर आणि ग्रामीण व बहुजन युवा नेतृत्व प्रविणभाऊ राऊत यांच्या वतीने उत्सव नात्यांचा….बहुजनांच्या विचारांचा आयोजित  भीम महोत्सव २०२५ कार्यक्रम नुकताच बदलापूर ( ठाणे ) येथील घोरपडे मैदानावर रेकॉर्ड ब्रेक गर्दीत जोरदार आणि तितकाच बहारदार संपन्न झाला. समाजाने संघटित होऊन समाजातील गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी लागणारी आर्थिक मदत असो , शालेय साहित्य असो त्यांच्या प्रगती साठी त्यांना पुरविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे आणि ते आम्ही करणार व गरीबांना मदत करणार.आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदात्त हेतू ठेवून आपण मदत करणार असल्याचे प्रविणभाऊ राऊत यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या जनसागर यांच्या स्वागतपर भाषणात राऊत बोलत होते.ह्या वर्षीच्या भीम महोत्सव कार्यक्रमास उपस्थित असलेल्या जनतेची , महिलांची अलोट गर्दी पाहून अनेकांनी कौतुक केले तर प्रविणभाऊ राऊत यांनी नतमस्तक होत सर्व उपस्थितांचे आभार मानले.

विश्वरत्न तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बाबासाहेबांनी देशाला अर्थात जनतेला अर्पण केली.ती काही एखाद्या राजाला किंवा राणीला अर्पण केलेली नाही.म्हणून भारतीय जनतेला लोकशाही प्राप्त झाली. तेव्हापासूनच आपणास मुक्त स्वातंत्र्य मिळाले. म्हणून अस्पला देश लोकशाही प्रधान देश आहे लोकशाही वाचविणे आपले कर्तव्य आहे असे आवाहन प्रख्यात साहित्यिक , लेखक , विचारवंत माजी संपादक उत्तमराव कांबळे यांनी केले.आम्ही भारतीय लोक या विषयावर कांबळे बोलत होते.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, गायिका मीरा भालेराव ,कविता राम , गायक मधुर शिंदे, प्रवीण डोने  प्रतीक वाघ आदींनी बहारदार गीते सादर करून कार्यक्रमास बहरच आणला.

कार्यक्रमास बाळूमामा व घरोघर मातीच्या चुली सिरियल फेम सिने अभिनेता सुमित पूसावळे, रात्रीचा खेळ चाले मधील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर , झुंड मूवी फेम रॅपर विपिन तातड , रितेश खरात, सागर गायकवाड, कुणाल जाधव आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमास रंगत आणून उपस्थितांचे मने जिंकली.

मुरबाडचे आमदार किसन कथोरे, मा.नगराध्यक्ष नंदकिशोर  पातकर, वामन म्हात्रे , परशुराम आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते , नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Oplus_131072
Oplus_131072

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here