भारतराज पवार – राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. आपल्या बातम्या आणि जाहिराती अवघ्या काही सेकंदात पोहचणार महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात आणि राहाल जनतेच्या मनामनात. म्हणून तात्काळ संपर्क : ९१५८४१७१३१
बदलापूर / मुंबई : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : बदलापूर ( मुंबई ) शहर व ग्रामीण भागातील प्रगतशील बौद्ध समाज बांधवांतर्फे ” उत्सव नात्यांचा…. बहुजनांच्या विचारांचा जबरदस्त भीम महोत्सव कार्यक्रमांचे आयोजन येत्या रविवारी दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले असून कार्यक्रमास अनेक प्रख्यात दिग्गज गायक , सिनेकलाकर , विचारवंत उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
ह्या कार्यक्रमास प्रामुख्याने लोकप्रिय प्रख्यात गायक आनंद शिंदे , गायिका मीरा भालेराव , कविता राम , गायक मधुर शिंदे , प्रवीण डोने , प्रतीक वाघ यांसह झुंड मुवी फेम रॅपर विपिन तातड , रितेश खरात , सागर गायकवाड , कुणाल जाधव तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात ठाण मांडून बसणारे बाळूमामा व घरोघरी मातीच्या चुली सिरियल मधील सिने अभिनेता सुमित पुसावळे , रात्रीचा खेळ चाले मधील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर उपस्थित राहून उपस्थित प्रेक्षकांचे मने जिंकणार यात शंकाच नाही.
तर मा.संपादक , अध्यापक , साहित्यिक , सुप्रसिद्ध व्याख्याते तथा विचारवंत मा.उत्तम कांबळे यांचे ” आम्ही भारतीय लोक ” ह्या विषयावर व्याख्यान होणार असून भीम महोत्सव कार्यक्रमांचे व कांबळे सरांच्या व्याख्यानाचा लाभ प्रचंड जनसंख्येने , तरुणांनी , महिलांनी तसेच तरुण भगिनींनी घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक प्रगतशील बौद्ध समाज बदलापूर शहर व ग्रामीण यांनी आणि कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक आयु.प्रवीणभाऊ राऊत ( बहुजन युवा नेतृत्व ) तसेच भीम महोत्सव मॅनेजमेंट टीम यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ : घोरपडे मैदान हेंद्रेपाडा , बदलापूर ( प.) , वेळ – संध्या. ५ ते रात्री ११ वा.






