२४ सप्टेंबर पर्यंत नाशिक जिल्ह्यातील पाऊस पूर्णतः जाणार मात्र….. हवामान तज्ञ पंजाबराव डख
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या व जाहिराती साठी संपर्क : 9158417131

अहमदनगर : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आज आणि उद्या पर्यंत नाशिक जिल्ह्यात पाऊस राहणार असल्याची माहिती प्रख्यात हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना दिली.जिल्ह्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरली असून पाण्याचे नियोजन करावे लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.मात्र २४ सप्टेंबर पर्यंत नाशिक जिल्ह्यातील पाऊस पूर्णतः जाणार असल्याचा अंदाज त्यांनी सांगितला आहे.जिल्ह्यात लवकरच सूर्य दर्शन होणार असून समस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले असून या वर्षी महाराष्ट्रातून ७ ऑक्टोबर रोजी परतीच्या पाऊसाला सुरुवात होणार असून मात्र महाराष्ट्रातील जनतेची दिवाळी मात्र ओली असणार कारण दिवाळीत पाऊस पडणार असून मराठवाडा,विदर्भ या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असून २८ ऑक्टोबर पासून थंडीस सुरुवात होणार असल्याचेही डख यांनी यावेळी सांगितले. दरम्यान नवीन वर्षाच्या जानेवारी २०२३ मध्ये ढग फुटीसह मोठा पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान शास्त्रज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहे.