जबरदस्त धक्का दायक : नाशिकचा कंपनी संचालक निघाला भामटा जमा केल्या ४ कोटीच्या नोटा …लिंक ओपन करूनवाचा सविस्तर
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक / संचालक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क साधा : .मो.९१५८४१७१३१

नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : विलास गडाख :- गुंतवणूक केलेल्या रकमेवर जास्त आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून नाशिकच्या एका बड्या व्यापाऱ्याने नाशिकमधीलच एका डिस्ट्रिब्युटरच्या 4 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी आदित्य राधेश्याम मालीवाल (वय ३३, रा. इशदया, अक्षय रीजन्सीच्या बाजूला, शंभूनगर, गारखेडा, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वावरे लेन मधील ईगल इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकिसन खेमानी व श्रीनाथ अहिरवाडकर यांनी संगनमताने दि.५ मार्च २०२० ते १५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध वितरकांना गुंतवलेल्या रकमेवर जास्त आर्थिक फायदा करून देण्याचे अमिष दाखवून त्या सर्वांचे मिळून ४ कोटी ६ लाख ८ हजार २१६ रुपयांचा अपहार केला.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक के.पी.खांडवी करित आहेत.