शिर्डी : साईबाबा मंदिराचे विश्वस्त मंडळ बरखास्तीचे आदेश
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क करा . मो. 9158417131
औरंगाबाद : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : विलासराव गडाख : शिर्डी येथील साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.येत्या दोन महिन्यातच नवे विश्वस्त मंडळ नियुक्त करावे,असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.त्यामुळे ही बाब राज्यभरातच चर्चेची ठरली आहे.

राज्यातील प्रसिद्ध आणि श्रीमंत देवस्थानमध्ये शिर्डीच्या साई बाबा मंदिर देवस्थानचा समावेश आहे. औरंगाबाद खंडपीठाने आता या देवस्थानचे विश्वस्त मंडळच बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.गेल्या सहा महिन्यांपूर्वीच हे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते. मंदिर संस्थानच्या जाहीरनाम्यानुसार,हे विश्वस्त मंडळ नसल्याचा आक्षेप उत्तमराव शेळके यांनी घेतला होता.तसेच,यासंदर्भात त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली.या याचिकेवर गेल्या काही महिन्यात सुनावणी झाली.तर,आज अंतिम सुनावणीत न्यायालयाने निकाल दिला आहे.आता हे विश्वस्त मंडळ बरखास्त होणार आहे.तसेच, येत्या दोन महिन्यात नवे विश्वस्त मंडळ नेमावे लागणार आहे.शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राज्यभरातून सभासद नेमण्यात येतात.त्यातून १६ जणांना या मंडळावर निवडण्यात येते.
Shirdi Sai Baba Temple Board of Trustee Dismissed Court Order.