September 25, 2023

रेल्वे प्रमाणे ट्रक सारखे अवजड वाहने लवकरच हायवे वर धावणार :केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी

1 min read

भारत पवार  : मुख्य संपादक : बातम्या आणि जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा. मो.9158417131

नवी दिल्ली : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  : भारतामध्ये लवकरच इलेक्ट्रिक हायवे सुरू केला जाणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या उद्योग संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.त्यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी पवन आणि सौर ऊर्जेवर आधारित चार्जिंग प्रणाली विकसित करण्यास प्रोत्साहन देत आहे.सौरऊर्जेवर चालणाऱ्या विद्युत महामार्गांच्या विकासाबाबत देखील सरकार काम करत आहे.याबरोबरच रस्ते मंत्रालय सर्व टोल प्लाझा पवन आणि सौर ऊर्जेवर चालवण्यास प्रोत्साहित करत आहे.इलेक्ट्रिक हायवे विकसित झाल्यास महामर्गांवरून अवजड वाहतूक करणारी वाहने जसे की,ट्रक-बसचं धावता-धावताच चार्जिंग होणार आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौरऊर्जा आधारित चार्जिंग केंद्र विकसित करण्यात केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ट्रक आणि बससारखी अवजड वाहने न थांबताच चार्जिंग करणे सुलभ होईल असे गडकरी यांनी सांगितले आहे.टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहनधारकांना सोयीस्कर पद्धतीने शुल्क आकारण्यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणालीवर देखील काम सुरु आहे.
यासाठी सरकार पथदर्शी प्रकल्प तयार करत असून, त्याद्वारे महामार्गावर जाणाऱ्या वाहनांकडून अचूक अंतराच्या आधारे टोल आकारला जाणार आहे.या नवीन तंत्रज्ञानाद्वारे आम्हाला दोन उद्दिष्टे साध्य करायची आहेत.यामध्ये टोल बूथवरील मुक्त वाहतूक आणि वापरानुसार पैसे देणे या दोन गोष्टींचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.