ही न्यायव्यवस्था काहिकांची रखेल झाली…., शिंदेंचा नाद खुळा महाराष्ट्र केला पांगळा..! महाराष्ट्रात काळजी वाहू सरकार
1 min read

परखड, निर्भिड, सडेतोड लिखाण असलेले महाराष्ट्रातील एकमेव नंबर वन असलेले महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : भारत पवार: मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर : गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्र दूषित असलेले राजकारणाचे ग्रहण काल सुटण्याची चिन्हे दिसली असे असले तरी सद्या महाराष्ट्रात काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काम पहाणार आहेत.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपला नाद खुळा असे दाखून दिले.त्यांनी बंडखोरी करून ४० ते ५० आमदारांची शिदोरी आपल्या सोबत ठेवल्याने महाराष्ट्राचे राजकारण दूषित झाले आहे त्यामुळे जनहिताचे निर्णय घेण्याची क्षमताच दुबळी झाल्याने जनतेने आपले प्रश्न,आपल्या समस्या कोणाकडे मांडाव्यात अशी आजची राजकारणीही स्थिती करून टाकली आहे.फक्त स्वतःच्या स्वार्था साठी बंड पुकारने हे कितपत योग्य असणार ? असा सवाल जनतेत व्यक्त केला जात आहे.बंडखोर आमदार गुवाहाटी येथील हॉटेल मध्ये थांबून दिवसाला तब्बल आठ लाख रुपये त्या हॉटेल बील खर्च केला जात आहे.अजून कितीतरी खर्च होत असणार यात शंकाच नाही.हा पैसा ह्या बंडखोरांनी आणला कुठून ? हा सुद्धा संशोधनाचा विषय झाला आहे.आज गुरुवारी विधानसभेत बहुमत चाचणीस महाविकास आघडी सरकारला सामोरे जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश केल्या नंतर ना.उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री पदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.आणि मुख्यमंत्री यांनी थेट राजभवन गाठत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत राजीनामा सादर केला.यावेळी राज्यपाल यांनी सांगितले की पर्यायी व्यवस्था होई पर्यंत आपण मुख्यमंत्री पदी रहावे अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली.म्हणजेच सध्या महाराष्ट्रात काळजी वाहू सरकार असून मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरे विराजमान आहेत.मात्र या राजीनामा नाट्य मुळे भाजपच्या गोटात महाराष्ट्रातील सत्ता कापीज करण्या साठी खूपच उतावीळ पणा संचारला असून गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेसाठी आसुसले भाजप पुढे सरसावले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी म्हंटले आहे की,. ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेली झाली..,. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली… मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे….कारण… इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीेन झाली…!