आजची मोठी बातमी : जि. प.आणि मनपा निवडणुका लांबणीवर ,सद्याची प्रभाग रचना शासनाने केली रद्द

0
66

गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या शुभेच्छा जाहिराती आता “अल्प दरात “पोहचतील महाराष्ट्राचा घरा घरात ,जनतेच्या मना मनात .आजच संपर्क करा : संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : विलासराव गडाख – इतर मागासवर्गीय समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे.ओबीसी आरक्षणासाठी सर्व पक्ष एकत्र आले असून एकमताने आज निर्णय झाला आहे.त्यानुसार,राज्य सरकार नवा अध्यादेश आणणार आहे.त्यानुसार, सध्या करण्यात आलेली प्रभागरचना आता रद्द होणार आहे.यापुढे निवडणूक आयोग प्रभाग रचना तयार करणार नाही.तर,राज्य सरकार ही प्रभाग रचना तयार करेल.त्यानंतर ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाला मंजुरीसाठी पाठवेल.आयोगाने मंजुरी देताच प्रभाग रचना लागू होईल.हा अध्यादेश विधिमंडळात मंजूर होऊन त्याचे कायद्यात रुपांतर होईल.त्याचबरोबर ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक इम्पिरिकल डेटा गोळा करुन तो सर्वोच्च न्यायालयाला सादर केला जाईल.त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लांगणीवर पडल्या आहेत.या सर्व निवडणुका पाच ते सहा महिन्यांनी होण्याची चिन्हे आहेत.या निर्णयाबाबत राज्य सरकारने विधेयक क्र. ५ आणि ६ दोन्ही सभागृहात मंजूर करुन घेतले आहे.विरोधकांनी देखील या दोन्ही विधेयकांना एकमताने पाठिंबा दिला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here