खाजगीकरण हे आरक्षण उद्ध्वस्त करणार धोरण तर मोहन भागवतांनी हिंदू राष्ट्राची ” टिमकी ” वाजवू नये _ दीपक केदार

0
76

गुढी पाडव्याच्या अर्थात मराठी नववर्षाच्या जाहिराती साठी संपर्क करा.आपली जाहिरात कमी दरात महाराष्ट्र भर प्रसिध्दी केली जाईल.” अल्प दरात तुमची जाहिरात घरा घरात ” त्वरीत संपर्क करा :, संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१.                  पाटोदा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _   
मोहन भागवतांनी हिंदु राष्ट्राची टिमकी वाजू नये हे संविधानराष्ट्र आहे…
सम्राट अशोक धम्म परिषद कारखेड येथून बोलतांना सामाजिक परिवर्तनासाठी अशा धम्म परिषदा होण काळाची गरज आहे. तरुण आज पुढे येतोय त्याला नवनिर्मिती हवी आहे. त्याच त्याच जुन्या कथाना तो वैतागलेला आहे. येणारा काळ आंबेडकरी तरुणांसाठी निर्णायक काळ आहे. जयभीम नारा केंद्रस्थानी आहे. जयभीम नावाने चित्रपट येणं, जयभीम नारा चित्रपटांमध्ये दाखवणे हे समजून घ्या आणि यानिमित्ताने जयभिमच अस्तित्व कायम ठेवा.
झुंड चित्रपट हिट होणारच आमचं वास्तवच तितकं भयाण आहे. अनेक वास्तववादी कहाण्या आहेत. नितीन आगे प्रेम केलं म्हणून लिंबाला लटकून मारला, विराज जगताप मारला, भीमराज गायकवाड मारला, अश्विनी सूर्यवंशी मारली, टिकटॉक इंस्टा, फेसबुक आलय पण आजही आम्हाला भानामती केली म्हणून टांगून मारलय, भोतमांगे न्याय न्याय करत मेला तंटामुक्त गाव पुरस्कार देणाऱ्या आऊलादी आजही सत्तेत आहेत. या सगळ्या स्टोऱ्या आहेत आमचे वास्तव भयाण आहे. झुंड मधे फिल्मी संधी मिळाली वास्तवात आम्हाला संधी कुठय?
आम्हाला आजही जातीमुळे नाकारलं जातय, आम्हाला संधीच मिळालेली नाही. संशोधकांना आंदोलन करावं लागतय, हक्कांसाठी रोहित वेमुलाला मरावं लागतय. झोपडपट्टी ब्लॅक लिस्टेड घोषित केल्यात आमच्या बेरोजगारासाठी लोन सुद्धा आम्हाला दिलं जात नाही. आमचे गायरान, घरकुल अतिशय छोटे साधे प्रश्न सत्तर वर्षात संपले नाहीत. ते कोणतीही व्यवस्था प्रश्न मिटू शकलेली नाही.
शेतकरी आत्महत्या झाली तर त्याची बातमी बनते, त्याला आर्थिक मदत होते. हाताला काम नाही, शेतमजुरी नसलेल्या भूमिहीनानी आत्महत्या केली तर त्याची नोंद सुद्धा होत नाही हा वर्ग बौध्द आहे.
70 वर्षात पारधी समाजाला सामाजिक स्वतंत्र मिळालेले नाही. 2 वर्षांचा मुलगा बोकड चोरीच्या संशयावरून मारला जातो, आई बाबा हे शब्द सुद्धा त्याला नीट म्हणता येत नसेल, त्याच्यावर चोरीचा आळ घातला मारून टाकला. देशाचे आमच्या हक्काचे 10000 करोड रुपये नीरव मोदी, विजय मल्ल्या घेऊन पळून गेला तो चोर नाही का? त्याला मारण्याची हिंमत या नपुसक आऊलादिंची आहे का? आमचं वास्तव भयाण आहे.
आम्ही संविधान धोक्यात आहे म्हंटल्यावर काही म्हणतात हे शक्य नाही. खाजगीकरण 450 सरकारी संस्था विक्रीत काढल्यात यात आरक्षण सुरक्षीत कुठंय? आरक्षण उद्धवस्त झालं आहे. कामगारांना काढल जातय त्याचे अधिकार हिस्कावले जाऊ लागलेत. 2024 ला आरएसएस ला 100 वर्ष होत आहेत त्यानी हिंदू राष्ट्र म्हणायला सुरवात केली आहे. संविधान संपवणे हा त्यांचा अजेंडा आहे. आपल्याकडे जगण्याचा अधिकार संविधानात आहे. संविधान वाचवण्यासाठी पुढे येणारा काळ संविधान वाचवण्याचा संघर्ष आहे त्यासाठी तयार रहा. मोहन भागवतने हिंदुराष्ट्र नावाची टिमकी वाजवणे बंद करावे हे बुद्धराष्ट्र संविधानराष्ट्र आहे ते बदलू देणार नाहीत.
राजकारणावर मी बोललो की काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठतो. त्यांना माझा इतिहास माहीत नाही. आपल्याकडे युवकांना रोखण्यासाठी हि थेरी वापरली जाते. आपल्याकडे सामाजिक, आर्थिक, धार्मिक वाल्यांनी लढू नये म्हणतात आपण खल करत बसलो, भांडत बसलो तिकडे नारळ डोक्या उत्तरप्रदेश च मंत्रालय भगव करून खुर्चीवर बसला. निवडणूक लढवने हा सांवैधानिक हक्क आहे. अफवा केली जाते आमचे खासदार आमदार जिंकू शकत नाहीत. मी ज्या मातीत भूमीत आज उभा आहे त्या हदगाव चे हरिहर राव सोनुले समाजाचे खासदार म्हणून निवडून आले होते. ते डॉ. बाबासाहेबांसोबत उभा होते.
राजकीय अजेंडा महत्वाचा आहे. दलित हत्याकांडाविरोधात मी गेल्यावर्षी विधानभवनावर धडक दिली. तेंव्हा मी ओरडत होतो की माझ्या समाजाचे तरुण मारले जाात आहेत तुम्ही आमचा प्रश्न घ्या. ना संसदेत ना विधानभवनात आमचा प्रश्न कुणीही घेतला नाही. त्यामुळे मला जाणीव झाली की एक जरी पँथर सभागृहात गेला तरी सगळ्यांना भारी पडेल, स्वाभिमानाने समाजाचा आवाज उठवेल. समाजाचा आमदार आजपर्यंत झालाच नाही. जे झाले ते बाहेर आम्ही दलितांचे म्हणून मत घेतले आणि आत गेल्यावर सवर्ण होऊन बसले त्यांच्या अजेंड्यावर दलितांचे प्रश्न कधी आलेच नाहीत. त्यामुळे तरुणांनी राजकीय परिवर्तनासाठी पुढं यावं, राजकीय क्रांती करावी.
मी समाजाचा आवाज होतोय म्हणून माझा आवाज दाबला जातोय, मला कैद करण्याचा कट केला जातोय. मी लढतोय मी थांबणार नाही, निळ्या झेंड्याच अस्तित्व वाचवणारच…
आमच्या गर्दीला मेंढर म्हटल जातं हे दुर्दैवी आहे. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना संधी द्या ते भारतातील सर्वात बुद्धिजीवी जमात म्हणून पुढे येतील. ही गर्दी नसती तर नामांतर लढा, रिडल्स, गायरान हक्क आंदोलन, इंदू मिल, भीमाकोरेगाव संघर्ष, आया बहिणींच्या अब्रू आपण वाचऊ शकलो नसतो. प्रगती झालेले समाजाला विसरले आहेत आणि ते आम्हाला मेंढर म्हणायला निघालेत आहेत. त्यांना आमचा वास येऊ लागला आहे आता ते आमच्याविरोधात बंड करु लागलेत, आम्हाला जेलमध्ये टाकायला निघालेत. स्वाभिमान आम्हीच टिकवला आहे आमच्यावर कसलाही आरोप नाही. स्वाभिमानाची ताकद घेऊन आम्ही निघालो आहोत. आम्ही जे करतो ती देशाची स्टाईल होत आहे.
आम्ही लढलो आज दलित अत्याचार कंट्रोल मधे येत आहे. राज्यभर आम्ही पँथर फौज उभा केली आहे. पँथर चळवळीचा दरारा वाढला आहे तो कायम ठेवण्यासाठी पुढे पेटून उठा बंड करा.
मी इव्हेंट नेता नाही, मी अशा गादीवर, या डिजिटल माईकवर कधी बोलत नाही. इव्हेंट चळवळ जास्त काळ टिकत नसते, मग ती दंगलीच्या इव्हेंट मधून असो की रंगीबेरंगी सजावटीच्या इव्हेंट मधून असो. नामदेव ढसाळ इव्हेंट नव्हते म्हणून ते आजही जीवंत आहेत. मी कार्यकर्त्यांना सांगत असतो मला पुतळ्याखाली उभा करा, मला वस्तीत उभा करा आम्ही मातीत उभा राहून लढत राहिलो म्हणून आज गावा गावात संघटनेची चर्चा आहे. अशी परखड भूमिका ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी मांडली.
यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले, मराठवाडा नेता अशोक पाटील, प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे, आयोजक सुधाकर कांबळे, माजी आमदार विजयराव खडसे, आदरणीय दवणे सर, प्रा. काळबांडे उपस्थित होते. हजारो उपसिका उपासक भीमसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here