आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा .संपर्क : भारत पवार :मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१ नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _ सध्या सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी आणि तेवढीच टेंशनमुक्त (भयमुक्त ) करणारी बातमी असून विद्यार्थ्यांना परीक्षेत आणि अभ्यासात कोणत्याही प्रकारचे दडपण नको भयमुक्त परीक्षा व्हावी म्हणून यंदाच्या (सध्या) सुरू होणाऱ्या दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत भरारी पथक / स्कॉड राहणार नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नसून भय मुक्त परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.परीक्षेत पर्यवेक्षक म्हणून शाळेतीलच शिक्षक राहणार असून जवळच्या शाळेतील शिक्षक हे बैठे पथक म्हणून राहणार आहेत. कोविड मुळे दहावी व बारावीच्या परीक्षा बाबत मोठे संभ्रम निर्माण झाले होते परीक्षा ऑफलाईन घेण्यावर शासन ठाम होते तर परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.मात्र आता परीक्षा बाबतचा निर्णय होऊन गेल्याने वरील प्रमाणे निर्णय शासनाने घेतला आहे.
