देवळा नगरपंचायतीत पुन्हा महिला राज ,भारती आहेर नव्या नगराध्यक्ष ? उपनगराध्यक्ष साठी अनेकांचे केदा आहेर यांना साकडे

0
72

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील ५५००० + वाचक संख्या असलेले परखड, निर्भिड अन्यायावर वार करणारे क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी पत्रकार नेमणे आहेत तसेच  बातम्या,जाहिराती साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक : ९१५८४१७१३१

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : _ नाशिक जिल्ह्यातील कळवण ,देवळा,सुरगाणा ,पेठ,दिंडोरी व निफाड नगरपंचायती साठी निवडणूक घेण्यात आली होती.यात देवळा नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती.संपूर्ण राजकारण्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.कारण भाजपा चे जिल्हाध्यक्ष केदा आहेर हे देवळा येथील असल्यामुळे साहजिकच राजकारण्यांच लक्ष देवळा नगरीत केंद्रित होणे आवश्यक बाब होती.आणि केदा आहेर यांचाही मोठा प्रतिष्ठेचा प्रश्न होता.म्हणून केदा आहेर यांना उमेदवारांपेक्षा मोठी कसरत करावी लागली.आहेरांच्या कसरती आणि व्युव रचनेमुळे राष्ट्रवादी वाल्यांना घाम फोडला की ते सुद्धा ” झुकले ” आणि आज तरी मात्र नगरसेवक पदा पासून ” हुकले ” काही अपवाद वगळता भाजपने एक हाती सत्ता पटकावून केदा आहेर मात्र ” किंग मेकर ” ठरलेत. हि देवळा आणि तालुक्या साठी ” भूषणावह ” बाब आहे.त्यामुळे साहजिकच देवळा नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदा साठी केदा आहेर यांची भूमिका आणि त्यांचा शब्द ” प्रमाण ” असणार आहे. निवडणूक झालेल्या वरील सहा नगरपंचायती साठी नगराध्यक्ष पदा करीता इच्छुकांचे नामांकन अर्ज भरण्या साठी काल दि.८/२/२०२२ रोजी शेवटचा दिवस होता.यात देवळा नगरपंचायती साठी अखेरच्या दिवसा पर्यंत सौ.भारती अशोक आहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला .त्यामुळे देवळा शहरात पुन्हा एकदा “महिला राज ” अवतरले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.कारण फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. सगळ्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदा साठी ची निवडणूक आणि घोषणा मात्र मंगळवार दि.१५/२/०२२ रोजी केली जाणार आहे. यावेळी भारती आहेर यांच्या नावावर देवळा नगराध्यक्ष म्हणून अधिकृत शिक्कमोर्तब केले जाणार आहे.नगराध्यक्ष पदा साठी नियुक्ती झाल्यानंतर लगेचच विशेष सभेचे आयोजन करून उपाध्यक्ष पदा साठीची प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामुळे देवळा नवनिर्वाचित अनेक इच्छुक नगरसेवकांनी केदा आहेर यांना साकडे घालण्यास रेलचेल चालविल्याने उपाध्यक्ष पदा साठी आहेर लक्ष देणार कोणाच्या नावा कडे ? याकडे नवनियुक्त नगरसेवकांसह देवळा वासियांचे लक्ष लागून आहे.त्यामुळे किंग मेकर ची भूमिका जरी महत्वाची ठरणारी असली तरी केदा आहेर यांची ही एक कठीण परीक्षाच आहे.ही परीक्षा त्यांचे साठी नवीन तर मुळीच नाही हे तितकेच खरे.नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचा अडीच _ अडीच वर्षाचा रोटेशन फॉर्म्युला असणार की काय ? याची उत्सुकता सुद्धा देवळा वासियांना लागली असून हे कोडे लवकरच सुटणार यात शंका नाही.                                 नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. भारती अशोक आहेर या माजी जि प सदस्य आहेत तर एकेकाळचे देवळा गावचे सरपंच अशोक आहेर यांच्या त्या पत्नी होत. त्यामुळे सौ. भारती आहेर यांना राजकीय वारसा घरातूनच लाभल्यामुळे विकास कामे  करण्यात ते माहीर असणार हे मात्र नक्की.                     लेखक / शब्दांकन : भारत पवार , मुख्य संपादक ” महाराष्ट्र न्यूज ”  ९१५८४१७१३१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here