आता सातबारा उतारे बंद होणार अंमलबजावणी नाशिक जिल्ह्यापासून होणार : शासन निर्णय

0
49

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिरात आणि बातम्या करीता संपर्क : ९१५८४१७१३१.                               मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _ वाढते शहरीकरण आणि वाढती लोसंख्या आणि मोठ्या शहरात शेतजमीन शिल्लक नसल्या कारणाने सात बारा उतारे बंद करण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला.राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सात बारा उतारे देखील सुरू आहेत अशा शहरांमध्ये सात बारा उतारा बंद करून त्या ठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे. वाढत्या शहरी करणामुळे अनेक ठिकाणी शेत जमीनच शिल्लक राहिलेली नाही अनेक शहरातील शेत जमीन जवळपास संपलेली आहे त्यामुळे या शहरांमधील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सातबाराचे प्रॉपर्टी कार्ड मध्ये रूपांतर झालं असताना सुद्धा कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सातबारा कायम ठेवला जातो त्यामुळे फसवणुकी सारखे प्रकार घडतात म्हणून सर्व शहरातील सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख खात्याने घेतला आहे .                                  या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमल बजावणी करण्याची सुरुवात नाशिक जिल्ह्या पासून तर पुण्यातील हवेली तालुका, सांगली ,मिरज पासून होणार आहे.हा प्रयोग ह्या जिल्ह्यात व तालुक्यात यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.सिटी सर्व्हे झाला असल्यास सात बारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणे आवश्यक असताना सुद्धा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत सिटी सर्व्हे झाला पण सातबारा उतारा नाही अशाही काही जमिनी आहेत त्यातून अनेक घोळ निर्माण होऊन न्यायालयीन खटल्यांचीही संख्या वाढते आहे ह्या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी शेतीसाठी वापर होत नसलेल्या जमिनींचा ७/१२ कमी करण्याची प्रक्रिया जमाबंदी आणि भूमिअभिलेख विभागा कडून सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here