तहसीलदारांच्या उपस्थितीत स्टोन क्रेशर माफियांनी रामदास बच्छाव यांना ठार मारण्याची दिली धमकी ,तहसीलदारांची भूमिका मात्र मी ऐकलेच नाही ,मालेगावी तक्रार दाखल
1 min read

मुख्य संपादक : भारत पवार ,मो.9158417131. मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचा काहूर काही अंशी शमले असले तरी तालुक्यात स्टोन क्रेशर माफियांनी आपले डोके वर काढल्या मुळे तालुक्यातील शांतता भंग होते की काय ?असे भय तालुका वासियांना वाटू लागले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर नागरिक मालेगावच्या तहसीलदारांच्या कारभारावर नाराज असून त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहण्याची भूमिका नागरिकांची होते आहे. समजलेली हकीकत अशी की दरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास बच्छाव यांनी तीन स्टोन क्रेशर विना परवाना सुरू असल्याची तक्रार मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यांचे कडे दाखल केली असून त्याची दखल घेत उप विभागीय दंडाधिकारी यांनी संबंधित तक्रारदार यांना सोबत घेऊन घटनेची चौकशी करून तक्रार दाखल करण्याचा आदेश जारी केला आहे.या कामी तक्रारदार रामदास बच्छाव हे तहसीलदार यांच्याकडे गेले असता स्टोन क्रेशर माफियांनी तहसीलदारां समोरच बच्छाव यांना तोंडी ठार मारण्याची धमकी दिली. तहसीलदार यांनी बघ्याची भूमिका घेऊन मी ऐकलेच नाही अशी कसरत करून जसे काही झालेच नाही असा आव आणून स्टोन क्रेशर माफियांना कुठल्याही प्रकारे काही न म्हणता त्यांच्यावर कार्यवाही केलेली नाही त्यामुळे बच्छाव यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून स्टोन क्रेशर माफियांनी प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांसमोरच धमकीचे अश्र वापरल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून तहसीलदारांनी मी ऐकलेच नाही अशी भूमिका घेणे आणि स्टोन क्रेशर माफियांना सहीसलामत ठेवणे म्हणजे कुठेतरी पाणी मूरते अशी चर्चा तालुक्यात असून नागरिक तहसिलदारांच्या असल्या कारभारामुळे त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले आहेत. तर रामदास कारभारी बच्छाव यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे कडे धाव घेतली असून मला व माझ्या कुटुंबियांच्या जिवास धोका निर्माण झाला असून मला व माझ्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन फिर्याद दाखल करण्यात यावी अशी मागणी बच्छाव यांनी लेखी अर्जाद्वारे अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्याकडे केली आहे.
