ग्रामसेवक संभाजी देवरे यांचा भास्करराव पेरे पाटील यांच्या हरते झाला सत्कार दिला पुरस्कार

0
42

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहणेर येथील रुद्र्योग बहुउद्देशीय विकास संस्थेद्वारे दिला जाणारा मानाचा पुरस्कार माळवाडी येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक संभाजी रामभाऊ देवरे यांना मिळाला असून माळवाडी ग्रामस्थांनी देवरे यांचे अभिनंदन करून कौतूक केले आहे.हा पुरस्कार दर वर्षी मान्यवरांच्या हस्ते दिला जात असतो.ज्या कर्मचाऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असेल ज्यांचे कार्य आदर्श असेल अशाच ग्रामसेवकांना किंवा नोकरदार व्यक्तींना हा पुरस्कार दिला जात असतो.संभाजी देवरे यांनी माळवाडी गावी उल्लेखनीय व इतरांना हेवा वाटावा असे कार्य केले असून आणि आजही करीत आहेत.विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वी खालप गावी ग्रामसेवक म्हणून चागली कामगिरी केली आहेच.सद्या ते देवळा तालुक्यातील माळवाडी व डोंगरगाव येथे कार्यरत आहेत.शासकीय कामाचा कितीही मोठा ताण असेल तरी त्यांनी हसत मुखाने आपले काम करून जनसेवा हिच ईश्वर सेवा समजून कामाचा ताण स्वतःसह इतरांना सुद्धा जानऊ देत नाहीत. देवरे यांना” ग्रामगौरव ” हा पुरस्कार व प्रशस्तीपत्र महाराष्ट्र राज्यात प्रख्यात असलेले आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात देऊन गौरविण्यात आले. संभाजी देवरे यांचे नाशिक जि. प.चे सी ई ओ.लीना बनसोड मॅडम, देवळा येथील तहसीलदार सूर्यवंशी,गट विकास अधिकारी देशमुख , सर्व ग्रामविस्तार अधिकारी ,ग्रामसेवक सहकारी ,माळवाडी चे सरपंच शिवाजी वामन बागुल, ग्रामपंचायत सदस्य व गावातील तरुणांनी जोरदार अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारत पवार आणि सर्व पत्रकार बंधूंनी ग्रामसेवक देवरे यांचे विशेष अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here