गरिबीचे चटके बसलेले श्रेणी -२ अधिकारी भास्करराव खरे यांचा आमच्या हस्ते सत्कार झाला हा योगायोगच म्हणावा बरे ..! बागलाण तालुक्यातील जनतेस मिळाला सोज्वळ ,मनमिळाऊ अधिकारी

0
61

( बागलान तालुक्यातील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक भास्करराव खरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना डावीकडून महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक भारत पवार, किशोर दादा सोनवणे, शांताराम पवार , छाया : शरयू _ ग्रीष्मा फोटोज् महाराष्ट्र न्यूज )                                                                        सटाणा :  क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रमोद पवार _ अनेकांना उन्हाचे चटके बसलेले असतात आणि ते कसे बसे सहन करावे लागतात. हे चटके खाणारे जवळ जवळ सगळेच असतात कारण गरीब _ श्रीमंत हा भेदभाव नसतोच.सगळ्यांना सारखी ऊर्जा देणे हा सृष्टीचा नियम आहे .हे आपणास माहीत आहेच.परंतु गरिबीचे चटके खाणारे उन्हाचे चटके खाणाऱ्या पेक्षा अधिक असतात.गरिबी त्यांच्या सटवी लाच पुजलेली असते.वेळेवर जेवण नसते, मुबलक प्रमाणात कपडे नसतात , आई _ वडिलांच्या हाताला काम नसते अशा परिस्थतीमध्ये जगावे कसे ? हा मोठा प्रश्न असतो.बाकी शिक्षण घेणे हा तर दूर दूरचा विषय ठरतो.त्यामुळे बऱ्याच वेळा अनेक गरीब घरच्या मुलांना शिक्षण अर्धवट सोडून आई, वडील यांच्या बरोबर कामास जाऊन त्यांना मिळेल त्या पैशाची मदत करून गुजराण करावी लागते. इतकी हलाखीची परिस्थिती गरिबांची असते.हे मी सुद्धा अगदी जवळून अनुभवले आहे.अशीच हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा जिद्द ,चिकाटी , आत्मविश्वास यांच्या जोरावर माझे जिवलग मित्र आज भास्करराव खरे हे भूमी अभिलेख विभागात उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.हा माझा मान सन्मान तर आहेच परंतु मला त्यांचा अभिमान आहे ,गर्व आहे. आम्ही अगदी खेडेगावातून पुढे गेलेली मंडळी अगदी सहज पने जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला.कारण खरे साहेब आणि मी ( भारत पवार ) आम्ही दोघं ई.५ वी ते १० वी पर्यंत बेंच पार्टनर म्हणजेच ऐकच बेंचवर आम्ही बसायचो. तेव्हाची बागलाण तालुक्यातील आणि सध्या देवळा तालुक्यातील माळवाडी गावच्या लहानशा पण आमच्या परीने महान शाळेत शिक्षण घेतले.आणि पुढील उच्च शिक्षण आम्ही दोघं वेगवेगळ्या वाटेने मार्गक्रमीत केले. आमच्या दोघांच्या घरची परिस्थिती अगदी बेताची होती.बऱ्याच वेळा भास्करराव खरे साहेब यांना परिस्थितीने मजबूर केले होते.अनेकदा शाळेला दांडी मारुन वडिलांच्या कामास मदत म्हणून त्यांना काम करावे लागत असे.तेव्हा घर गाडा आणि दोन वेळचे जेवण  मिळत असे. अशाही परिस्थितीत शिक्षणाचा खर्च न पेलवणारा असताना जिद्द , चिकाटी, आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण पूर्ण करून खरे साहेबांनी श्रेणी -२ अधिकारी म्हणून नोकरी पटकावली .त्यांनी नाशिक , अमरावती,अहमदनगर येथे उत्कृष्टपणे सेवा बजावली   आणि  आता नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात भूमी अभिलेख उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मला सांगण्यास गर्व वाटतो की २५ लोकांचा स्टाफ त्यांच्या हाताखाली आज कार्यरत आहेत. खरे साहेबांचे विशेष म्हणजे त्यांचा मनमिळाऊ स्वभाव , हसत मुख चेहरा जनमानसात राहुन माणुसकी जोपासणारे अधिकारी म्हणून अहमदनगर ,नाशिक ,अमरावती येथील जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे. असे ख्यातनाम आणि कर्तव्यदक्ष ,सोज्वळ,व माणुसकी जोपासणारे अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयात क्वचित पहावयास मिळतात.असे कर्तव्यदक्ष ,माणुसकी जोपासणारे ,सोज्वळ अधिकारी बागलाण तालुक्यातील जनतेस मिळणे म्हणजे तालुका वासियांचे नशीबच म्हणावे लागेल.ख्याती असलेल्या अशा अधिकाऱ्याचा अर्थात भास्करराव खरे यांचा सत्कार करण्याचा योग मला ( भारत पवार ) आणि माझे सहकारी मित्र आर.पी.आय.चे जिल्हा नेते सटाणा येथील किशोरदादा सोनवणे ,देवळा येथील शांताराम पवार यांना मिळाला. याआधी माझे जवळचे सहकारी बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव चे उपसरपंच व आर.पी.आय.चे जिल्हा उपाध्यक्ष बापूराज खरे यांनीही पुष्पगुच्छ देऊन भास्करराव खरे साहेबांचा सत्कार केला.                          शब्दांकन : भारत पवार ,.                                                       * मुख्य संपादक / संस्थापक ,महाराष्ट्र न्यूज                   * मुख्य संपादक / संस्थापक _ क स मा दे                         टाइम्स ( साप्ताहिक ) न्यूज पेपर्स                             * महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ,                                                     * नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष _ माहिती अधिकार का. महासंघ . मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here