January 16, 2022

ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली

1 min read

देवळा / माळवाडी _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ देवळा तालुक्यातील माळवाडी गावातील ग्रामसभा अत्यंत खेळीमेळीच्या परंतु प्रश्नांच्या भडीमार यांचे सह संपन्न झाली. विशेष म्हणजे ग्रामसभा चक्क तीन वेळा घेण्यात येऊन तिसऱ्यांदा चांगल्या वातावरणात पार पडली.गावातील तरुणांनी विशेष सहभाग घेतला होता.मात्र ज्येष्ठ नागरिकांनी लांबूनच बघ्याची भूमिका घेतली तर काही जेष्ठ नागरिक घरी राहून ग्रामसभेचा कानोसा दुसऱ्या व्यक्ती कडून जाणून घेत समाधान व्यक्त करत होते. यावेळी गावातील ज्या काही  बेघर व्यक्तींना घरकुल मंजूर करण्यात आले अशांची नाव वाचण्यात आली तर काहींना पशू पालन , जनावरें शेड उभारणी आदींचे नाव घोषित करण्यात येऊन ज्यांना गांडूळ खत प्रकल्प व अन्य शासकीय योजना राबवायच्या असतील अशा व्यक्तींनी येत्या दोन दिवसात ग्रामसेवक एस.आर .देवरे यांचे कडे नावे द्यावीत असेही आवाहन सरपंच शिवाजी बागुल यांनी यावेळी केले. ग्रामसभेस सरपंच  शिवाजी बागुल ,ग्रामसेवक देवरे ,उपसरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य , संपादक / पत्रकार भारत पवार  आदी पदाधिकारी सह गावातील निंबा बागुल , साहेबु बागुल ,हेमंत बागुल , भगवान बच्छाव, नितीन शेवाळे ,तात्या भदाणे , दावल भदाणे , मच्छिंद्र अहिरे आदी सह अनेक तरुण वर्ग उपस्थित होते. तब्बल चार तास ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली हे.खास वैशिष्ट्य ग्रामसभेचे ठरले. देवळा तालुक्यासह माळवाडी , फुले माळवाडी गावी संध्याकाळच्याा सुमारास पावसाचेेे जोरदार आगमन उशिरा पेरलेल्या बाजरी आणि मका पिकास या पावसाने जीवदाान मिळणार तर लवकर पेरणीी केलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांची हालत खराब होणार असे या पावसाचे चित्र आहे तर रब्बी पिकास पाऊस अनुकूल असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.

More Stories

1 thought on “ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली

  1. Even when Police Patil from Malwadi was present at the Gram Sabha, I mentioned in my newspaper that it is not socialism but you who are journalists and do politics. I do not think this is right in your case. You should be aware that you are a journalist.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.