मुद्रांक घोटाळ्यात गजाआड केलेला चंद्रकांत वाघ उर्फ गोटू पुन्हा अघोरी कृत्य करण्याच्या वाटेवर ? १४ लाख रुपयांची मागणीचा लावला त्याने जोर अन्यथा शेवाळे परिवारावर कृत्य करणार अघोर ?_ धमकी

0
17

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज :(, भारत पवार ,मो.9158417131 ) _ देवळा तालुक्यातील मुद्रांक घोटाळेबाज आरोपी चंद्रकांत वाघ उर्फ गोटू याचा माज काही केल्या कमी होईना त्याची घोटाळे करण्याची वृत्ती ही वाढतच चालली असून माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही अशा गुर्मीत राहुन त्याने कुंभार्डे येथील शेतकरी सुनील शेवाळे यांच्या कडे १४ लाख रुपयांची मागणी करण्याचा जोर केला असून मागणी पूर्ण नाही केल्यास शेवाळे कुटुंबीयास जीवे मारण्याची धमकी दिल्याने ह्या धमकीने शेवाळे कुटुंब घायाळ झाले असून देवळा तालुक्यात खळबळ माजली आहे.याबाबत सुनील शेवाळे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हा अध्यक्ष दिनेश अहिरे यांनी तात्काळ नाशिक येथील निवासी अप्पर जिल्हाधिकारी डोईफोडे यांचे कडे धाव घेऊन संबंधित घोटाळे बाज आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेला चंद्रकांत वाघ उर्फ गोटू याचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.याबात समजलेली हकीकत अशी की ,देवळा मुद्रांक घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेला आणि त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात चर्चित असलेला चंद्रकांत उर्फ गोटू वाघ याने तालुक्यातील कुंभार्डे गावातील शेतकरी सुनील शेवाळे यास धमकी दिली की मला १४ लाख रुपये दे. पैसे न दिल्यास सुनील शेवाळे व शेवाळे परिवारास जीवे मारण्याची धमकी देत असून असलेली जमीन विकून माझे पैसे वसूल करून घेणार असे निवेदनात म्हटले आहे. वाघ यांचे कडून अडचणीच्या प्रसंगी शेवाळे यांनी व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते.त्या पोटी ३७२७४७ रुपये परत करून देखील वाघ याने १४ लाख रुपयांची मागणी शेवाळे यांच्या कडे करू लागला. मागणी पूर्ण नाही केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊ लागल्याने शेवाळे कुटुंब घायाळ झाले आहे.शेवाळे यांनी वाघ यास कांदे विकून व रोख रक्कम स्वरूपात बॅंकेतून पैसे दिले.दोन लाख रुपयांच्या बदल्यात वाघ याने शेवाळे यांच्या आईच्या नावे असलेली ००.४० आर क्षेत्र हिरामण नामदेव ठाकरे यांच्या नावे विश्वासाने नावावर करून घेतले.सदर व्यक्ती वाघ यांचा नातेवाईक असून वाघ याने २०१४ रोजी जमीन स्वतःच्या नावे करून घेतली आहे. जमीन शेवाळे यांची असून आजरोजी ते जमीन कसत आहेत.या जमिनीच्या बदल्यात वाघ १४ लाख रुपयांची मागणी शेवाळे यांच्या कडे सातत्याने करू लागला. आणि जर पैसे न दिल्यास अजुन एक_दोन एकर क्षेत्र नावे जमीन विकून पैसे वसूल करणार अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून वाघ यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुनील शेवाळे यांनी केलीआहे.वाघ यांची गुन्हेगारी वृत्ती पाहता शेवाळे यास दिलेल्या धमकी व १४ लाख रुपयांच्या मागणी मुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here